गोवा खबर:भाजपा नेत्या आणि अभिनेत्री सोनाली फोगट यांच्या मृत्यू प्रकरणी उत्तर गोव्यातील हणजुणे पोलिस स्थानकात खूनाचा नोंदवण्यात आला आहे.
सोनाली यांच्या कुटुंबियांनी परवानगी दिल्या नंतर आज गोवा मेडिकल कॉलेज मध्ये पोस्टमॉर्टम करण्यात आले. रिपोर्टमध्ये शरीरावर अनेक जखमांचा उल्लेख असल्याने गोवा पोलिसांनी सोनाली यांचे भाऊ रिंकू ढाका यांनी दिलेल्या तक्रारीच्या आधारे खूनाचा गुन्हा नोंदवला आहे.
सोनाली फोगाट यांच्या मृत्यू प्रकरणी आता खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुधीर सांगवान व सुखविंदर सिंग यांच्याविरुद्ध हणजूण पोलिसांनी खुनाचा गुन्हा नोंद केला आहे.
सोनाली फोगाट यांचा भाव रिंकू यांनी याबाबत हणजूण पोलिस स्थानकात दिलेल्या तक्रारीच्या आधारे संशयीतां विरोधात खूनाचा गुन्हा नोंदवून त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे.
गोव्यात झालेल्या पोस्टमार्टम वर आपण समाधानी असून आता पुन्हा दिल्ली मध्ये पोस्टमार्टम करण्याची गरज नाही,असे सोनाली यांचा भाऊ रिंकू ढाका यांनी सांगितले.
सोनाली या भाजपाच्या नेत्या असून देखील त्यांच्या मृत्यूची घटना समजल्या नंतर गोव्यात भाजपाची सत्ता असून देखील भाजपाचा साधा कार्यकर्ता देखील भेटायला आला नसल्या बद्दल रिंकू यांनी नाराजी व्यक्त केली आहे.