Connect with us

गोवा खबर

राष्ट्रपतींची अयोध्या येथील श्री राम जन्मभूमी मंदिराला भेट; रामलल्लाचे दर्शन

Published

on

Spread the love

 

गोवा खबर:राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज (19 मार्च 2026) उत्तर प्रदेशातील अयोध्या येथे श्री राम जन्मभूमी मंदिराला भेट देऊन रामलल्लाचे दर्शन घेतले. त्यांनी मंदिर परिसरातील विविध ठिकाणी दर्शन व आरती केली तसेच श्री राम यंत्र स्थापना व पूजन केले.

प्रभू श्रीराम यांचा जन्म झालेल्या अयोध्या नगरीच्या पवित्र भूमीला स्पर्श करणे हा अत्यंत सन्मानाचा क्षण आहे, असे यावेळी बोलताना राष्ट्रपती म्हणाल्या. चैत्र शुक्ल प्रतिपदेच्या पवित्र दिवशी, संवत्सर 2083 च्या प्रारंभी आणि नवरात्रीच्या पहिल्या दिवशी येथे उपस्थित राहणे हा त्यांच्यासाठी खरोखरच भाग्याचा क्षण असल्याच्या भावना त्यांनी व्यक्त केल्या.

या अत्यंत पवित्र श्री राम जन्मभूमी मंदिराच्या भूमिपूजनाचा दिवस, येथे रामलल्लाच्या दिव्य मूर्तीची प्राणप्रतिष्ठा, राम दरबार भक्तांसाठी खुला होणे आणि मंदिराच्या शिखरावर धार्मिक ध्वज फडकविण्याचे क्षण हे आपल्या इतिहास आणि संस्कृतीतील सुवर्णक्षण असल्याचे राष्ट्रपती म्हणाल्या.

   

रामराज्याची संकल्पना आर्थिक समृद्धी आणि सामाजिक सौहार्द यांचे सर्वोच्च मूल्य व्यक्त करणारी आहे. प्रभू श्रीराम यांच्या जीवनातील अनेक उदाहरणे सर्वसमावेशक जीवनदृष्टीचे प्रतीक आहेत. आजच्या काळात सामाजिक समावेशन आणि आर्थिक न्याय यांसारखी राष्ट्रीय उद्दिष्टे निश्चित करून त्यांची प्रभावी अंमलबजावणी केली जात आहे. रामराज्याच्या आदर्शांचे पालन केल्यास आपण नैतिकता आणि धर्मनिष्ठेवर आधारित राष्ट्र उभारू शकतो, असे त्यांनी नमूद केले.