Connect with us

गोवा खबर

गोव्यात युनायटेड कलर्स ऑफ बेनेटनच्या नवीन स्टोरचे उद्घाटन

Published

on

Spread the love

 

 गोवा खबर: पश्चिमेला आपले ठसा बळकटत, युनायटेड कलर्स ऑफ बेनेटन इंडियाने आज गोव्यात आपला सातवा स्टोर उघडण्याची घोषणा केली आहे. लंडन स्टोर संकल्पनेवर आधारित ह्या स्टोरचे नाव ऑक्सफर्ड स्ट्रीट लंडन येथे असलेल्या त्यांच्या पहिल्या स्टोरवर अवलंबून आहे. स्टोरमध्ये केवळ पुरुष, महिला आणि लहान मुलांचे कपडेच नाही तर कासा बेनेटन नावाची एक संपूर्ण होम कलेक्शन श्रेणी सुद्धा आहे. या लंडन स्टोर संकल्पनेमध्ये उत्कृष्ट ब्रँड आणि खरेदीचा अनुभव देण्यासाठी स्टोरमध्ये अनौपचारिक लाउंज आणि हायटेक स्पेस यांसारखे  घटक देखील आहेत.

चोगम रोडवर असलेली बेनेटनची ही इमारत, द पलाझो देल कापितानिऍतो द्वारे प्रेरित आहे, ज्याला लॉजिया देल कापितानिओ, विसेंझा इटली असे देखील म्हटले जाते. हा एक डेस्टिनेशन स्टोर आहे ज्यात ब्रँडचा दृष्टिकोन सौंदर्यशास्त्र, आतील सजावट आणि उत्पादन बाहेरील जगासमोर प्रदर्शित करून व्यापार करण्यावर आहे. ३१०० स्क्वेर फूट मध्ये पसरलेला हा स्टोर राज्याचे दोलायमान आणि हवेशीर वातावरण प्रतिबिंबित करण्यासाठी डिझाइन केला गेला आहे. तसेच स्टोरच्या भिंतीवर एक ग्राफिटी बनविण्यात अली आहे जी गोव्याच्या दृष्टीने बेनेटनच्या जगाचे चित्रण करते.

 

ग्राहकांना वयक्तिक आणि हृदयस्पर्श अनुभव देण्यासाठी स्टोरमध्ये कस्टमायझेशन कॉर्नर देखील आहे. तसेच

 नैसर्गिक लाकडी साहित्याचा वापर करून ह्या स्टोरची रचना करण्यात आली आहे, स्टोरचे फुर्निचर वास्तविक लाकडाने बनविलेले आहे, ट्रायल रूमला सुद्धा पूर्ण लाकडाचे स्वरूप देण्यात आले आहे , आणि त्याच्या किरकोळ क्षेत्रातील भिंती फर्मासेल बोर्डाने बांधलेल्या आहेत. एकूणच स्टोरचा स्वरूप ब्रँडचा प्रीमियम अनुभव देण्यासाठी बनवला गेला आहे.

“आम्हाला चोगम रोड येथील एका प्रतिष्ठित इमारतीमध्ये आमचे नवीन स्टोर सुरू करण्यात खूप आनंद होत आहे. व्यापाराच्या दृष्टीने गोवा हे उत्कृष्ट राज्य आहे ज्याच्या माध्यमातून आम्ही ग्राहकांकडे उच्च दर्जाचे इटालियन फॅशन पोचविण्याचा प्रयत्न करू, तसेच संपूर्ण  स्टोरचा अनुभाव ब्रॅंडसाठी एक महत्वपूर्ण बदल घडवून  आणतो कारण ही नवीन संकल्पना आजच्या व्यस्त ग्राहकांच्या मागण्यांना डिझाइन व्यवसायांसह एकत्रित करते” असे युनाइटेड कलर्स ऑफ बेनेटन, सीईओ रामप्रसाद श्रीधरन म्हणाले.