गोवा खबर:शेळपे-सांगे येथील साळावली जल प्रक्रिया प्रकल्पाच्या १६० एमएलडी जल वाहिनीचे तांतडीचे दुरूस्ती काम करावयाचे असल्याने २५, २६ आणि २७ ऑगस्ट २०२३ रोजी १६० एमएलडी साळावली जल प्रक्रिया प्रकल्पांतून (१२० एमएलडी) मर्यादित प्रमाणात पाणी पुरवठा केला जाईल.

वरील काळांत नवीन १०० एमएलडी जल प्रक्रिया प्रकल्पातून पूर्ण क्षमतेने पाणी पुरवठा होईल. ग्राहकांनी या गैरसोईची नोंद घ्यावी, असे सार्वजनिक बांधकाम खात्याच्या पाणी पुरवठा विभागाने कळविले आहे.