Connect with us

गोवा खबर

पर्तगाळी जीवोत्तमचे मठाधीश द् विद्याधीश तीर्थ श्रीपाद वडेर स्वामीजी यांच्या हस्ते ‘सनातन पंचांग २०२७’ कन्नड ॲपचे विमोचन !

Published

on

Spread the love

गोवा खबर:श्री गोकर्ण पर्तगाळी जीवोत्तम मठ येथे मठाधीश श्रीमद् विद्याधीश तीर्थ श्रीपाद वडेर स्वामी यांच्या शुभहस्ते ‘सनातन पंचांग २०२७’ या कन्नड ॲपचे भावपूर्ण वातावरणात विमोचन करण्यात आले. या पवित्र प्रसंगी स्वामीजींनी पंचांग ॲपला आशीर्वाद दिले. हे पंचांग ॲप केवळ कन्नडच नव्हे, तर एकूण ७ भाषांमध्ये उपलब्ध असल्याची माहिती स्वामीजींना देण्यात आली, तेव्हा त्यांनी “छान” असे उद्गार काढत या कार्याचे कौतुक केले, तसेच या ॲपचे आतापर्यंत ४० लाखांहून अधिक डाऊनलोड्स झाल्याचे समजताच त्यांनी विशेष आनंद व्यक्त करत या यशाची प्रशंसा केली.

स्वामीजींच्या हस्ते कन्नड ॲपचे विमोचन झाल्याबद्दल ‘सनातन पंचांग’ समूहाच्या वतीने त्यांच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. या वेळी ‘सनातन पंचांग’ समूहाचे प्रतिनिधी म्हणून श्री. संगम बोरकर उपस्थित होते.

‘सनातन पंचांग’ हे ॲप ॲंड्राईड (Android) आणि आयओएस (iOS) या दोन्ही प्रणालींवर कन्नड, मराठी, हिंदी, इंग्रजी, गुजराती, तेलुगु आणि तमिळ अशा ७ भाषांमध्ये उपलब्ध आहे. सद्यःस्थितीत ॲंड्राईड (Android) प्रणालीवर सर्व भाषेतील ॲपचे ४० लाखांहून अधिक, तर आयओएस (iOS) प्रणालीवर ७ लाखांहून अधिक भाविकांनी डाउनलोड केले आहे. आपण स्वतः आपले नातेवाईक, मित्रपरिवार आणि कार्यालयीन सहकाऱ्यांना हे अत्यंत उपयुक्त ॲप डाउनलोड करण्यास प्रवृत्त करून भारतीय संस्कृतीच्या प्रसारात सहभागी व्हावे, असे आवाहन ‘सनातन पंचांग’च्या वतीने करण्यात येत आहे.

‘सनातन पंचांग ॲप’च्या माध्यमातून दैनंदिन शुभमुहूर्त, सण-उत्सव, धर्मशिक्षण, आरोग्यविषयक उपयुक्त टिप्स, सुविचार आणि दैनंदिन जीवनासाठी आवश्यक अशी मौलिक माहिती सहज उपलब्ध होते. संकष्टी चतुर्थी, एकादशी यांसारख्या महत्त्वाच्या तिथींच्या पूर्वसूचना (नोटिफिकेशन्स), दिनविशेष, होमस्क्रीन विजेट आणि रिमाइंडर अशा अनेक आधुनिक सुविधा या ॲपमध्ये अंतर्भूत आहेत.