Connect with us

गोवा खबर

दैवज्ञ क्रिकेट कप स्पर्धेच्या जर्सीं व चषकांचे अनावरण

Published

on

Spread the love
गोवा खबर:अखिल गोमंतकीय दैवज्ञ ब्राम्हण यूथ असोसिएशनने आयोजित केलेल्या सहाव्या दैवज्ञ कप क्रिकेट स्पर्धेच्या जर्सीचे व चषकांचे अनावरण आज एका उत्साहपुर्ण वातावरणात मडगावात संपन्न झाले. ही स्पर्धा १० व ११ फेब्रुवारी असे दोन दिवस फातोर्डा येथील साग मैदानावर खेळवली जाणार आहे. या स्पर्धेत १७ संघ सहभागी झाले असुन, दोन महिला संघांचा पण समावेश आहे.
या जर्सी व चषक अनावरण सोहळ्याला १७ ही संघाचे कर्णधार, प्रतिनिधी व पुरस्कर्ते उपस्थित होते.

#ADVT विकसित भारत;विकसित गोवा 2047!

#ADVT विकसित भारत;विकसित गोवा 2047!

ही स्पर्धा यंत्र डेव्हलॉपर्स, स्वरुप-व्ही एस रायकर ज्युवेलर्स, रमाकांत ज्युवेलर्स, अंता ज्युवेलर्स, विद्या स्पेशलिटी अल्ट्रा साऊंड सेंटर, लोटलीकर ज्युवेलर्स, आदर्श कॅटरर्स व हॉटेल कॉस्मिक यांच्या सहकार्याने आयोजित करण्यात येत आहे.
आजच्या कार्यक्रमात असोसिएशनचे अध्यक्ष प्रशील साळकर यानी स्पर्धेबद्दलची सविस्तर माहिती दिली. शिवाय या संस्थेतर्फे अनेक समाजपयोगी उपक्रम राबविले जातात याची माहिती दिली.
रोहित वेर्णेकर, सचिव व खजिनदार भुषण शिरोडकर यानी चषक अनावरणाचा कार्यक्रम संपन्न केला.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रिया व्ही नागवेकर हिने केले तर रोहित वेर्णेकर यानी सर्वांचे आभार व्यक्त केले.