Connect with us

गोवा खबर

कला – संस्कृती खात्याची माटोळी व देखावा स्पर्धा २८ ऑगस्ट पासून अर्ज उपलब्ध, ८ सप्टेंबर पर्यंत अर्ज स्वीकारणार

Published

on

Spread the love

गोवा खबर:कला व संस्कृती संचालनालय गणेश चतुर्थीच्या ३ ऱ्या ते ६ व्या दिवसापर्यंत म्हणजे २१ ते २४ सप्टेंबरपर्यंत राज्य स्तरीय माटोळी आणि देखावा स्पर्धा जाहीर झाली आहे.

या दोन्हीही स्पर्धा राज्य स्तरावर घेण्यात येतील. त्याचे बक्षि‍सांचे स्वरूप खालील प्रमाणे.

            या वर्षी माटोळी स्पर्धेसाठी प्रथम पारितोषिक – रू. २०,००० (वीस हजार फक्त), द्वितीय  पारितोषिक –रु. १५,००० (पंधरा हजार फक्त), तृतीय पारितोषिक –रु. १२००० (बारा हजार फक्त), तसेच चौथे  रु. १०,००० (दहा हजार फक्त) आणि ५ वे पारितोषिक रू. ८.०००, आणि रू. ५.०००ची पांच उत्तेजनार्थ पारितोषिके दिली जातील.

त्याचप्रमाणे गोव्यातील नोंदणीकृत सार्वजनिक गणेश उत्सव मंडळांसाठी देखावा स्पर्धा गणेश चतुर्थीच्या ७ व्या ते १० व्या दिवसापर्यंत म्हणजे २५ ते २८ सप्टेंबरपर्यंत धेण्यात येतील. तर देखावा स्पर्धेसाठी प्रथम पारितोषिक –रू. ३५,००० (पस्तीस हजार फक्त), द्वितीय  पारितोषिक –रु. ३०,००० (तीस हजार फक्त), तृतीय पारितोषिक –रु. २५,००० (पंचवीस हजार फक्त), तसेच चौथे  रु. २०,००० (वीस हजार फक्त) आणि ५ वे पारितोषिक रू. १५.०००, आणि रु. १०,००० (दहा हजार फक्त) ची पांच उत्तेजनार्थ पारितोषिके दिली जातील. स्पर्धेत आवश्यक स्पर्धक संख्या कमी झाल्यास ही स्पर्धा राखून ठेवण्याचा किंवा रद्द करण्याचा अधिकार खात्याला राहील.

या स्पर्धेचे अर्ज कला आणि संस्कृती संचालनालय संस्कृती भवन पाटो, पणजी-गोवा, रविंद्र भवन – मडगाव, रविंद्र भवन – कुडचडे, रविंद्र भवन – साखळी, रविंद्र भवन – बायणा- वास्को व राजीव गांधी कला मंदीर, फोंडा येथे २८ ऑगस्ट २०२३ पासून उपलब्ध असतील. पूर्ण भरलेले अर्ज दिनांक ८ सप्टेंबर २०२३  पर्यंत कार्यालयीन वेळेत स्वीकारले जातील. हे अर्ज कला आणि संस्कृती संचालनालयाच्या www.artandculture.goagov.inया संकेत स्थळावर उपलब्ध असतील.