Connect with us

गोवा खबर

भाजपाने 30/40 कोटी रुपये देऊन आमदार विकत घेतले:दिनेश राव

Published

on

Spread the love
गोवा खबर:भाजपाने काँग्रेसच्या आमदारांना करोडो रुपये, सत्ता आणि विविध सरकारी यंत्रणांची भिती दाखवून  पक्षांतराला भाग पाडले असा आरोप काँग्रेसचे गोवा निरीक्षक दिनेश गुंडू राव यांनी केला. दिगबंर कामत  आणि मायकल लोबो हेच या पक्षांतराचे मास्टरमाईंड आहेत. लोबो यांना वाघ समजलो होते पण ते तर उंदीर निघाले असा चिमटा देखील दिनेश राव यांनी लोबो यांना काढला.
गोव्यात काँग्रेसमधील आठ आमदार भाजपमध्ये दाखल झाल्यानंतर गोव्याचे प्रभारी दिनेश गुंडूराव बुधवारी उशीरा रात्री गोव्यात दाखल झाले. दिनेश राव यांनी उरलेले काँग्रेस आमदार, प्रमुख नेते, कार्यालय प्रभारी यांची देखील भेट घेऊन चर्चा केली. त्यानंतर दिनेश गुंडू राव यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर आणि काँग्रेसचे वरिष्ठ नेते उपस्थित होते.
दिनेश गुंडू राव म्हणाले, दिगबंर कामत आणि मायकल लोबो  हे दोघेच या पक्षांतराचे मास्टरमाईंड आहेत. दिगबंर कामत  यांनी पक्षांतर करणार नाही अशी मंदीर,चर्च आणि मशीदी मध्ये शपथ घेतली. इतर आमदारांनी देखील चर्च, दर्गावर जाऊन पक्षांतर करणार नाही, अशी शपथ घेतली. पण त्यांनी देव आणि मतदारांशी प्रतारणा केली आहे. या आमदारांनी सत्ता, पैसा आणि आपल्या चुकीच्या कामासाठी हे पक्षांतर केले. आठ आमदारांना 30 ते 40 कोटी रूपये देण्यात आले, असा आरोप दिनेश गुंडू राव  यांनी केला.
काँग्रेसमधून कचऱ्याची दुसरी खेप बाहेर पडली अशा शब्दात दिनेश गुंडू राव यांनी आठ आमदारांना संबोधले आहे. दिनेश गुंडू राव म्हणाले, 2019 मध्ये काँग्रेसमधून कचऱ्याची पहिली खेप बाहेर पडली. आता दुसरी खेप बाहेर पडली आहे. पक्षांतर केलेल्या आमदारांना पुन्हा पक्षात स्थान देणार नाही, गोव्यातील काँग्रेसची पुर्नबांधणी केली जाईल. उरलेले काँग्रेसचे तीन आमदार गोव्यातील जनतेचे विषय नेहमीच मांडत राहिल असे दिनेश गुंडू राव यांनी नमूद केले.