Connect with us

गोवा खबर

नाताळपूर्वी काँग्रेस आमदारांची शेवटची सेल:  अमित पालेकर

Published

on

Spread the love
भाजपची ऑपरेशन लोटस आप विरुद्ध अयशस्वी मात्र काँग्रेस विरुद्ध ठरली यशस्वी: कॅप्टन व्हेंझी व्हिएगस
गोवा खबर:कॉंग्रेसचे आठ आमदार जनभावनेला सुरंग देत भाजपमध्ये अखेर प्रवेश केल्यावर आम आदमी पक्षाचे आमदार कॅप्टन व्हेन्झी व्हिएगस यांनी “भाजप का दिल मांगे मोर” अशी टिप्पणी करत कॉंग्रेस आमदारांची शेवटची सेल नाताळपूर्वी संपणार असल्याचा दावा केला आहे. 
काँग्रेसच्या या मेगा सेलनंतर आप ही गोवा आणि गोमंतकीयांसाठी एकमेव आशा आहे  हे पुन्हा एकदा सिध्द झाले आहे. ही कॉंग्रेस जनता पार्टी यावेळीही गोमंतकीयांना मूलभूत सुविधा देण्यात अपयशी ठरणार हे निश्चित आहे. त्यामुळे अशा संधिसाधू राजकारण्यांना त्यांची जागा दाखवून देण्याची वेळ आली आहे, असे व्हिएगस म्हणाले.
पणजी येथील आयोजित पत्रकार परिषदेत व्हिएगस बोलत होते. यावेळी आपचे अध्यक्ष अॅड अमित पालेकर, आप वेळ्ळीचे आमदार इंजिनियर क्रुझ सिल्वा, आप उपाध्यक्ष वाल्मिकी नाईक आणि आप नेते जर्सन गोम्स उपस्थित होते.
आपचे अध्यक्ष अमित पालेकर म्हणाले, “भाजपला “विरोधी पक्ष मुक्त” भारत हवा असल्याने विरोधकांना संपवण्यासाठी देशभर त्यांचे प्रयत्न चालू आहे. दिल्ली आणि पंजाबमध्ये ‘आप’च्या नेत्यांना लाच देण्याचे प्रयत्न झाले, पण भाजपचा ऑपरेशन लोटस या ठिकाणी मात्र सपशेल अपयशी ठरला. देशात सध्या आप हा एकमेव पक्ष भाजपला जोरदार आव्हान देत आहे त्यामुळे लोकांसमोर आप हा एकच पर्याय आहे.”.
पालेकर म्हणाले, “काँग्रेसचे नेते भाजपमध्ये सामील होणे ही गोव्यासाठी अत्यंत अपवित्र युती आहे. संपत्ती आणि सत्तेसाठी भाजपमध्ये सामील झालेल्या आठ आमदारांनी केवळ देवांचाच नव्हे तर गोमंतकीयांचाही विश्वासघात केला. आम्ही देशातील एकमेव प्रामाणिक पक्ष आहोत आणि आमचे आमदार नेहमीच गोमंतकीयांच्या हितासाठी काम करतील.”
आप वेळ्ळीचे आमदार क्रुझ सिल्वा यांनी वेळ्ळीतील लोकांनी इतरांना न विनडता आप ला निवडल्याबद्दल त्यांचे कौतुक केले. ते म्हणाले, “काँग्रेसचे काही नेते आणि भाजप यांच्यातील सेटिंग निवडणुकीपूर्वी प्रसिद्ध झालेल्या व्हिडिओमध्ये उघड झाली होती. काँग्रेसला मतदान करणे म्हणजे भाजपला अप्रत्यक्षपणे मत देण्यासारखे असल्याचे आप ने भविष्यवाणी केली होती. आज आप चे भाकित सत्यात उतरले आहे. ‘आप’चे आमदार कोणत्याही पक्षात सामील होणार नाहीत आणि सर्वसामान्यांच्या भल्यासाठी काम करतील, हे आमचे वचन आहे. ”