Connect with us

गोवा खबर

व्हॉलिबॉल संघासाठी निवड चाचणी

Published

on

Spread the love

 गोवा खबर:गोव्यात २५ ऑक्टोबर ते ९ नोव्हेंबर २०२३ पर्यंत राष्ट्रीय क्रिडा स्पर्धेचे आयोजन होणार असून या स्पर्धेच्या व्हॉलिबॉल क्रिडा प्रकारात गोव्याचे प्रतिनिधीत्व करण्यास संघाची निवड करण्यासाठी १२ ऑक्टोबर २०२३ रोजी मासान दी आमोरी व्हॉलिबॉल मैदानावर सकाळी ९.३० वाजता  वरिष्ठ महिला गट आणि दुपारी २.३० वाजता वरिष्ठ पुरूष संघसाठी निवड चाचणी आयोजित करण्यात आली आहे.

इच्छुक व्हॉलिबॉल खेळाडूनी निवड चाचणीच्या ठिकाणी अर्धा तास अगोदर उपस्थित राहावे आणि  दिलीप दिवकर-९५११६९२८८० आणि  प्रविण शिरोडकर-९१३०६१८५८९ यांच्याकडे संपर्क साधावा.