Connect with us

गोवा खबर

मुख्यमंत्र्यांकडून गोव्यातील लोकांना दिवाळीच्या शुभेच्छा

Published

on

Spread the love

गोवा खबर:मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी गोव्यातील लोकांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा व्यक्त केल्या आहेत.

 आपल्या संदेशात मुख्यमंत्री सावंत म्हणतात, दिवाळी हा दिपज्योतीचा सण असून आपल्या संस्कृतीचा एक महत्वाचा सण आहे. या दिवशी लंकेवर रावणाचा  वध करून भगवान श्री राम अयोध्येत परतले. दिवाळी हा उत्सव असून जो अंधारावर प्रकाशाचा आणि अज्ञानावर ज्ञानाचा विजयाचे प्रतिक आहे. यादिवशी भगवान रामाचे स्वागत करण्यासाठी लोक दिवे लावतात.

“दिवाळी सण कुटुंबाना एकत्र आणतो, दिवाळीत आपली घरे उजळतात आणि सकारात्मक उर्जेव्दारे आपली हृदये प्रकाशित होतात.  आपण दिवे लावून आणि एकमेकांना मिठाई देऊन आनंद साजरा करीत असतानाच, आपल्या समाजात करुणा, बंधुभाव आणि एकतेचा दिवा प्रज्वलित करूया.

  या पवित्र दिवशी, आपण पर्यावरणपूरक व सुरक्षित दिवाळी साजरी करण्याचा संकल्प करूया. हा दिवाळी सण प्रत्येक कुटुंबासाठी शांतता, उत्तम आरोग्य आणि समृद्धी आणि प्रत्येक दिव्याचा प्रकाश नवीन संधी घेऊन येवो व नातेसंबंध अधिक दृढ करो असे मुख्यमंत्री आपल्या संदेशात शेवटी म्हणतात.