Connect with us

गोवा खबर

गोवा विद्यापिठाचा ३३वा दीक्षांत समारंभ संपन्न

Published

on

Spread the love

गोवा खबर:गोवा विद्यापीठाचे कुलगूरू आणि राज्यपाल श्री पीएस श्रीधरन पिल्लई दोना पॉवला येथील राजभवनातील दरबार हॉलमध्ये आयोजित करण्यात आलेल्या गोवा विद्यापीठाच्या 33 व्या वार्षिक दीक्षांत समारंभात अध्यक्षस्थानी उपस्थित होते. शिक्षण म्हणजे केवळ ज्ञान आणि कौशल्ये प्रदान करणे नाही तर कोमल मनाला सद्गुणी व्यक्ती बनविणे असे आहे असे सांगितले.

 या समारंभासाठी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले राज्यपाल पुढे म्हणाले की, केवळ शैक्षणिक पात्रतेने चांगली व्यक्ती बनत नाही तर चांगले काम केल्याने चांगले नाव मिळण्यास मदत होते. “पुस्तकांमधून आपण जे शिकतो ते शिकणे आहे, तर जीवनातून जे शिकतो ते शहाणपण आहे असे कृतज्ञतेचे प्रतिक म्हणून मातृभूमीची आठवण ठेवून तिच्या वाढीसाठी आणि विकासासाठी योगदान देण्याचे आवाहन त्यांनी विद्यार्थ्यांना केले.

या सोहळ्याला मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत हे सन्माननीय पाहुणे म्हणून उपस्थित होते.

पुढे बोलताना राज्यपालांनी केरळ, कर्नाटक इत्यादी शेजारच्या राज्यांमध्ये जिथे ही प्राचीन आणि सुंदर भाषा बोलली जाते अशा कोंकणी भाषा संस्थांद्वारे मातृभाषेचा विस्तार करण्याची गोवा विध्यापिठाने  योजना कशी आखली आहे याची माहिती दिली.

नवीन शैक्षणिक धोरण (NEP) २०२०  ला ऐतिहासिक दस्तऐवज म्हणून संबोधून राज्यपाल म्हणाले की याने नवीन भारत आणि ‘आत्मनिर्भर भारत’चा पाया घातला. भारताला ‘आत्मनिर्भर’ बनविण्यासाठी त्यांनी नावीन्यपूर्ण विकास मॉडेल विकसित करण्यावर भर दिला हे लक्ष्य साध्य करण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता महत्त्वपूर्ण भूमिका बजावेल असे ते म्हणाले.

ग्लोबल वॉर्मिंग आणि हवामान बदलाची सध्याची परिस्थिती लक्षात घेऊन राज्यपालांनी विद्यार्थ्यांना निसर्गाच्या सानिध्यात राहण्याचे आवाहन केले.

इंग्रजांनी येऊन भारताचा नाश करण्यापूर्वी भारताचा व्यापार आणि अर्थव्यवस्था कशी चांगली चालली होती हे सांगताना राज्यपाल म्हणाले की प्राचीन भारत हे जगातील आघाडीचे आर्थिक सामर्थ्य आणि बौद्धिक केंद्र होते हे सत्य लपवून वसाहतवादाने भारत सर्वच क्षेत्रात मागासलेला असल्याचा प्रचार केला.  राज्यपाल म्हणाले की दोन शतकांहून अधिक काळ चाललेल्या दडपशाही आणि विध्वंसावर मात करून भारत आपली मुळे जपत आहे आणि प्रगती करीत आहे अशा वेळी देश ‘आझादी का अमृत महोत्सव’ साजरा करीत आहे. ते म्हणाले, “आपल्याला केवळ राजकीय स्वातंत्र्यच नाही तर महात्मा गांधींनी सामाजिक आणि आर्थिक स्वातंत्र्याचीही कल्पना दिली आहे.”

दोन वर्षांच्या कालावधीनंतर 33 व्या दीक्षांत समारंभाताचे आयोजन करण्यात आले असून ११०२८  पदवीधरांना बॅचलर पदवी, १५४६ पदव्युत्तर पदवीधरांना पदव्युत्तर पदवी आणि ६७ डॉक्टरेटची पदवी प्रदान करण्यात आली. याशिवाय १४९ जणांनी पदव्युत्तर पदविका प्राप्त केल्या आहेत. ७१ विद्यार्थ्यांना सुवर्णपदके, ७३  विद्यार्थ्यांना बक्षिसे आणि गुणवत्ता शिष्यवृत्ती मिळाली.

यावेळी न्यायालयाचे सदस्य आणि गोवा विध्यापिठाच्या इतर संस्था, डीन, प्राध्यापक, महाविद्यालयांचे प्राचार्य, पदवी प्राप्तकर्ते, पुरस्कार विजेते, पालक आदी उपस्थित होते.

सुरवातीस गोवा विध्यापिठाचे कुलगुरू, प्रा. हरिलाल बी. मेनन यांनी आपल्या स्वागतपर भाषणात सांगितले की गोवा विध्यापिठ मुख्यमंत्र्यांच्या गोव्यातील विद्यार्थ्यांचे कौशल्य वाढविण्यासाठी सर्व उद्योग संघटना, चेंबर्स ऑफ कॉमर्स आणि कॉर्पोरेट संस्थांसोबत काम करण्याच्या प्रतिपादनाचे समर्थन करते. त्यांनी भारत सरकारच्या ‘उन्नत भारत अभियान’ अंतर्गत गोवा विध्यापिठाने उत्तर गोव्यातील तीन गावे आणि दक्षिण गोव्यातील दोन गावे दत्तक घेतली आहेत अशी माहिती दिली आणि या भागातील रहिवाशांना लाभ मिळवून देणारे सागरी शेती उपक्रम यासारखे उपक्रम करीत असल्याचे सांगितले.