Connect with us

गोवा खबर

आंतर महाविद्यालयीन स्पर्धेत गोवा अभियांत्रिकीला दुसरे स्थान

Published

on

Spread the love

 गोवा खबर:फार्मगुडी येथील गोवा अभियांत्रिकी महाविद्यालयाने २०१९-२०२० या वर्षासाठी गोवा विद्यापीठाने आयोजित केलेल्या आंतर महाविद्यालयीन स्पर्धेत द्वितीय क्रमांक पटकावला.

       टेबल टेनिस आणि बुद्धिबळ या क्रीडा प्रकारांमध्ये गोवा अभियांत्रिकीने अजिंक्यपद पटकावले आणि बॅडमिंटनमध्ये उपविजेते ठरले. बॅडमिंटन आणि टेबल टेनिसच्या स्पर्धा म्हापसा पेडे येथे आणि बुद्धिबळासाठी गोवा विद्यापीठाच्या कॅम्पसमध्ये आयोजित करण्यात आल्या होत्या. राज्यात अस्तित्वात असलेल्या शासकीय, अनुदानित आणि खाजगी महाविद्यालयांसह ६१ महाविद्यालयांपैकी २१ महाविद्यालयांनी विविध विषयात पारितोषिके पटकावली.

       जीईसीचे प्राचार्य डॉ. राजेश बी. लोहानी यांनी टेबल टेनिस, बुद्धिबळ आणि बॅडमिंटनमध्ये प्राविण्य मिळविल्याबद्दल आणि क्रीडा क्षेत्रात संस्थेला नावलौकिक मिळवून दिल्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले. त्यांनी शारिरीक शिक्षण शिक्षक श्री. सागर आर नाईक लोटलीकर आणि क्रीडा प्रभारी डॉ. महेश कैसूरकर यांनी विद्यार्थ्यांना दर्जेदार प्रशिक्षण देण्यासाठी केलेल्या प्रयत्नांबद्दल त्यांचे अभिनंदन केले आणि त्यामुळे त्यांचे क्रीडा कौशल्य राज्यस्तरावर चमकण्यासाठी विकसित झाले असे सांगितले.