गोवा खबर: जेडी इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजी आणि जेडी स्कूल ऑफ डिझाईन, गोवाच्या (गोवा विद्यापीठाशी संलग्न) डिझायनर्स विद्यार्थ्यांनी गुरुवारी पणजी जिमखाना येथे आयोजित केलेल्या “जेडी डिझाइन अवॉर्ड्स २०२२” सोहळ्यात प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले.
शुक्रवारी शहरात जारी केलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की, डिझायनर्स विद्यार्थ्यांनी निसर्गाशी “सिंक” या संकल्पने अंतर्गत काम केले . त्यांनी तंत्रज्ञान आणि परिसंस्था एकमेकांशी जोडलेल्या भविष्यावादी जगाच्या संकल्पना मांडल्या.
डिझायनर्स विद्यार्थ्यांनी विविध फॅब्रिक्स, सामग्रीसह प्रयोग केले आणि निरोगी आणि समान जीवनाची कल्पना मजबूत केली. खालील सात डिझायनर्स विद्यार्थ्यांनी आपापल्या श्रेणींमध्ये पुरस्कार जिंकले. डेनिशा फर्नांडिस यांचे “नॅटिविडेड” (सर्वोत्कृष्ट प्रीट वेअर कलेक्शन), अनामिका चौहान यांचे “डेअर टू बी द डँडेलियन” (सर्वोत्कृष्ट प्रिट वेअर कलेक्शन), ब्रिटनी पाशेकोचे “रापोण” (सर्वोत्कृष्ट सस्टेनेबिलिटी कलेक्शन), जेझरिल मार्टिन्सचे “नेचर फूटप्रिंट” (विशेष ज्युरी अवॉर्ड), हृतिका साळगावकरचे “ओन्ली वन अर्थ”(सस्टेनेबल प्रेट वेअर) , विपुल गावकरचे
“आफ्टर द पार्टी” (सर्वोत्कृष्ट क्रिएटिव्ह संकल्पना) आणि डिओने डायस यांचे “फ्लोरिश”.(सर्वोत्कृष्ट डिझायनर कलेक्शन) .

याप्रसंगी बोलताना जेडी एज्युकेशनल ट्रस्टचे व्यवस्थापकीय विश्वस्त नीलेश दलाल म्हणाले, “जेडी डिझाईन अवॉर्ड्स २०२२ ची गोवा आवृत्ती प्रचंड यशस्वी ठरली आहे. नवोदित डिझायनर्सना जग कोणत्या दिशेने चालले आहे हे समजून घेण्याचे आणि सर्वांगीण वाढीसाठी योग्य मार्ग स्वीकारण्याचे आव्हान देण्यात आले. जेडी इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजी आणि जेडी स्कूल ऑफ डिझाईन, गोवा त्यांच्या प्रगत जागतिक अभ्यासक्रमाद्वारे आम्ही आजच्या जगाला त्यांच्या कल्पनेने समजून घेणारे डिझाइनर तयार करण्याची खात्री देतो.”
जेडी संस्थेला १९८८ पासूनचा वारसा आहे . त्यांनी गेल्या काही वर्षांत भारतीय डिझाईन उद्योगाला अनेक सुप्रसिद्ध चेहरे दिले आहेत. सध्या येथे फॅशन डिझाईन, इंटिरियर डिझाईन, फॅशन फोटोग्राफी आणि मेकअप व हेअरस्टाईल आर्टिस्ट्री मधील डिप्लोमा कोर्सेससह , फॅशन आणि इंटिरियर डिझाइनमधील पदवी अभ्यासक्रम आणि दोन्ही क्षेत्रातील प्रगत डिप्लोमा अभ्यासक्रमांसाठी प्रवेश खुले आहेत.
जेडी इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजी आणि जेडी स्कूल ऑफ डिझाईन, गोवा हे गोवा विद्यापीठ आणि सिंघानिया विद्यापीठाशी संलग्नित आहे. तसेच लंडन कॉलेज ऑफ फॅशन, यूके, द इंडो फ्रेंच चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री ,
चेल्सी कॉलेज ऑफ आर्ट अँड डिझाईन, यूके याशिवाय अन्य अनेक आंतरराष्ट्रीय महाविद्यालये आणि संघटनांशी संलग्न आहेत.