Connect with us

गोवा खबर

विधानसभा प्रकल्पातील अधिकार्‍यांसाठी आरोग्यविषयक सत्राचे आयोजन

Published

on

Spread the love

 गोवा खबर:गोवा विधानसभेने एनोब्लर प्रा. लिमीटेडच्या सहकार्याने नुकतेच विधानसभा प्रकल्पातील पीयुसी खोलीमध्ये त्यांचे कर्मचारी आणि अधिकारी यांच्यासाठी प्रेरक भाषणाचे आयोजन केले होते.

याप्रसंगी एनोब्लर प्रा. लिमीटेडच्या संचालक आणि आणि इमेज कन्सल्टंट श्रीमती दिव्य दुहेता महाजन यांनी निरोगीपणा, नेतृत्व आणि जीवन कौशल्य या विषयावर महत्वपूर्ण भाषण केले आणि कर्मचारी सदस्यांना तणाव व्यवस्थापनासंबंधी माहिती दिली. श्रीमती. दिव्य दुहेता महाजन या सरकारी कर्मचारी, कॉर्पोरेट्स आणि भारतीय सैन्यातील कर्मचाऱ्यांसाठी ही वेलनेसची सत्रे आयोजित करीत आहेत. या प्रसंगी आपले मौल्यवान विचार मांडल्याबद्दल गोवा विधानसभेने विधिमंडळ सचिवांच्या वतीने त्यांचे आभार मानले.