Connect with us

गोवा खबर

फोटो मतदार याद्यांच्या विशेष संक्षिप्त पुनरीक्षणासाठी सुधारित वेळापत्रक

Published

on

Spread the love

गोवा खबर:भारत निवडणूक आयोगातर्फे ०१ जानेवारी २०२३ या गोवा राज्यासाठी असलेल्या  अंतिम तारखेशी संबंधित फोटो मतदार याद्यांचे चालू असलेल्या विशेष संक्षिप्त पुनरीक्षणाच्या राहिलेल्या कामांसाठीचा कालावधी वाढविण्यात आला असल्याचे गोव्यातील सामान्य जनतेला व राजकीय पक्षांना कळविण्यात आले आहे.  

 गोवा राज्यासाठी असलेल्या ०१ जानेवारी २०२३ या अंतिम तारखेशी संबंधित, दावे व हरकती निकालात काढण्यासाठी मंगळवार, १० जानेवारी २०२३; आरोग्य निकष तपासण्यासाठी आणि अंतिम प्रकाशनासाठी आयोगाची परवानगी घेण्यासाठी व डेटाबेस अद्ययावत करण्यासाठी व पुरवणीच्या प्रकाशनासाठी शनिवार, १४ जानेवारी २०२३ आणि मतदार याद्यांच्या अंतिम प्रकाशनासाठी सोमवार, १६ जानेवारी २०२३, असे फोटो मतदार याद्यांच्या विशेष संक्षिप्त पुनरीक्षणासाठी सुधारित वेळापत्रक आहे.