गोवा खबर: राज्य ग्राहक आयोग, गोवा आणि जिल्हा ग्राहक आयोग हे गेल् काही महिन्यांमध्ये पूर्णपणे संयोजित करण्यात आली आहेत आणि पूर्णवेळ म्हणजेच स. १०.३० ते दु. ०१.०० आणि दु. ०२.०० ते सायं. ४.३० (किंवा दु. २.३० ते सायं. ५.३० प्रकरणपरत्वे) अशी कार्यरत आहेत, असे गोवा राज्य ग्राहक तक्रार निवारण आयोगाने कळविले आहे.
गोवा सरकारच्या सर्व कामकाजाच्या दिवशी वरील वेळेत सुनावण्या घेण्यात येतील.
२०१९ पूर्वीच्या सर्व प्रलंबित प्रकरणांच्या बाबतीत, आठवडा तत्त्वावर सुनावणी घेण्याचे ठरविण्यात आले आहे. असा प्रकरणांच्या बाबतीत, जर साप्ताहिक तारीख देण्यात आली नसेल, तर तारखेच्या रोजनाम्यामध्ये योग्य ते कारण नोंद केले जाईल.
अशा प्रकरणे सोडविण्यासाठी दावेदारांनी/वकिलांनी शुक्रवारी स. ११.०० ते दु. ०२.०० दरम्यान गोवा राज्य ग्राहक आयोगाच्या अध्यक्षांना भेटावे.