Connect with us

गोवा खबर

ग्राहक तक्रारी वेळेवर सोडविण्याचे ग्राहक व्यवहार खात्याचे आवाहन

Published

on

Spread the love

 गोवा खबर :राष्ट्रीय ग्राहक आयोगाच्या अध्यक्षांच्या मार्गदर्शक तत्त्वांच्या अंतर्गत, भारत सरकारच्या ग्राहक व्यवहार खात्याने घेतलेल्या उपक्रमाच्या अनुषंगाने, नोव्हेंबर २०२२ मध्ये ऑनलाईन परिषद घेण्यात आली होती असे गोवा राज्य ग्राहक तक्रार निवारण आयोगातर्फे कळविण्यात आले आहे. या परिषदेला एचडीएफसी लाईफ इन्शुरन्स कंपनी लि., ओरिएंटल इन्शुरन्स कंपनी लि., नॅशनल इन्शुरन्स कंपनी लि., बजाज अलायन्ज जनरल इन्शुरन्स कंपनी लि., आयसीआयसीआय लोम्बार्ड जनरल इन्शुरन्स कंपनी लि. आणि एसबीआय लाईफ इन्शुरन्स कंपनी लि. यासारख्या इन्शुरन्स कंपन्यांनी उपस्थिती लावली होती.

वरील सर्व इन्शुरन्स कंपन्यांच्या प्रतिनिधींनी त्यांच्या तरतुदी व मार्गदर्शक तत्त्वांनुसार ग्राहक तक्रारी वेळेवर सोडविण्याची इच्छा व्यक्त केली.

त्यामुळे, गोवा राज्य ग्राहक आयोग व जिल्हा ग्राहक आयोग यांच्याकडील अशा इन्शुरन्स पॉलिसी असणार्‍या ग्राहकांच्या तक्रारी वेळेवर सोडविण्यात याव्यात.

त्यामुळे उपरोक्त व इतर इन्शुरन्स कंपन्यांच्या प्रमुखांकडून त्यांना मार्गदर्शक तत्त्वे प्राप्त व्हावीत आणि खटले कमी करण्याच्या दृष्टीने आणि अशा दावेदारांच्या व इन्शुरन्स कंपन्यांच्या ग्राहक तक्रारी सोडविण्यासाठी ही ग्राहक प्रकरणे सोडविली जावीत, अशी विनंती करण्यात आली आहे.