Connect with us

गोवा खबर

नाताळसाठी व नववर्षासाठी वाहनांचे पार्किंग

Published

on

Spread the love

गोवा खबर:नाताळ व नववर्ष समारंभाच्या अनुषंगाने, जिल्हा दंडाधिकारी, उत्तर यांनी बार्देश तालुक्यातील कळंगुट व बागा ग्रामपंचायतींच्या अखत्यारीतील पुढील ठिकाणे, ३१ मे २०२३ पर्यंत सर्व प्रकारच्या वाहनांच्या पार्किंगसाठी तात्पुरती ठिकाणे म्हणून जाहीर केली आहेत.

कळंगुट गावातील सर्व्हे क्र. ४३४/४ व ४३४/५ मधील सेंट आलेक्स चर्चसमोर, कळंगुट गावातील सर्व्हे क्र. ३८८/१ व ३८८/२ मधील फार फिश रेस्टॉरंट जवळ, बोडके वडाकडे जवळ, परबवाडा कळंगुट गावातील सर्व्हे क्र. ३७५/५, ३७५/६, ३७५/७, ३७५/८, ३७५/९, ३७५/१०, ३७५/११, ३७५/१२, ३७५/१३, ३७५/१४ व ३७५/१५, कळंगुट गावातील सर्व्हे क्र. १६९/२१ मधील पर्यत क्रॉसजवळ आणि कळंगुट गावातील सर्व्हे क्र. २७८/१ ते २७८/२९ मधील बागा एन्ड.