गोवा खबर: लागीकोण बिझनेस डिरेक्टरी ॲप आणि वेबसायटच आज मडगाव नगरपालिकेचे अध्यक्ष दामोदर शिरोडकर यांच्या हस्ते गोवा मुक्ती दिनाच औचीत्त्य साधून नगर पालिकेच्या नगरसेवकांच्या उपस्थितीत उदघाटन करण्यातआले. गोवाभरातील लहान मोठ्या सर्व प्रकारच्या उद्योग धंद्याना आणि व्यावसायिकाना ऑनलाईन व्यासपीठ देवुन, त्यांना त्यांचा व्यवसाय माहिती तंत्रज्ञानाच्या माध्यमातून जास्तीत जास्त लोकांपर्यंत नेण्यास मदत करणे हे ह्या ॲपचे मुख्य उद्दिष्ट आहे. लागीकोण ॲप वापरकर्त्याला त्याच्या आजूबाजूच्या सर्व प्रकारच्या उद्योगधंद्याची, तसेच वेगवेगळ्या सेवा देणाऱ्यांची सचित्र माहिती, पत्ता ,संपर्क करण्यासाठीचे फोन नंबर तसेच त्यांच्या पर्यंत पोहोचण्यासाठीच जिपीएस लोकेशनहि ॲप वरती मिळते.
अतिशय सोप्या शोध प्रणाली मुळे ॲप वापरणारा पाहिजे त्यादुकान वा सेवेपर्यंत सहज पोहोचू शकतो. मडगाव ही गोव्याची आर्थिक राजधानी असल्याकारणाने, मडगाव मार्केटमधील उद्योग व्यवसायांना ॲप वर सर्वात आधी टाकण्यास सुरवात केली गेली. मडगावच्या न्यू म्युनिसिपल मार्केटमधील विविध उत्पादने आणि सेवा विकणारी शेकडो दुकाने आज लागीकोणॲप आणि वेबसाइटवर उपलब्ध आहेत.

यायोगेहे मार्केट गोव्यातील पहिले डिजिटल मार्केट बनले आहे. शुभारंभानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना, मडगावचे नगराध्यक्ष दामोदर शिरोडकर यांनी गोव्याची व्यापारी राजधानी – मडगाव येथून हा अनोखा उपक्रम सुरू केल्याबद्दल लागीकोण ॲप च्या प्रवर्तकांचे कौतुक केले. ते म्हणाले, “ लागीकोण ॲप लहान व्यवसायांना जास्तीत जास्त ग्राहकांपर्यंत पोहोचायला मदत करेल आणि त्याच वेळी ग्राहकांनाहि पाहिजे ती वस्तू सहज शोधण्यास मदत होईल.” मडगाव न्यू मार्केट ट्रेडर्स असोसिएशनचे अध्यक्ष विनोद शिरोडकर म्हणाले की, मडगाव मार्केट हे गोव्यातील सर्वात जुन्या बाजारपेठांपैकी एक असून या मार्केटचे संपूर्ण डिजिटलायझेशन केल्यास नवीन ग्राहकांना या मार्केटकडे आकर्षित करण्यास मदत होईल. या मार्केटमध्ये अनेक विविध उत्पादनांची, विशेषत: काही खास, विशिष्ट, पारंपरिक गोव्यातील उत्पादनांची विक्री होते . हे ॲप गोव्यातील लोकांना आणि राज्यातील पर्यटकांना येथे उपलब्ध असलेल्या अनोख्या उत्पादनांबद्दल जाणून घेण्यासहि मदत करेल, असेही ते म्हणाले.
या उपक्रमाचा उद्देश स्पष्ट करताना लागीकोण ॲप चे प्रवर्तक निरज नाईक म्हणाले, “आम्हाला ग्राहकांना त्यांच्या परिसरातील व्यवसायांशी जोडायचे आहे. गोव्यातील, खासकरून दुर्गम भागातील व्यावसायिकांना या ॲप वर आणणे आणि त्यांना माहिती तंत्रज्ञानाचा लाभ घेण्यासाठी मदत करणे हा या उपक्रमाचा संपूर्ण उद्देश आहे. व्यवसायिक माहिती व्यतिरिक्त , या ॲप मध्ये अनेक उपयुक्त डेटा जसे की पर्यटक आकर्षणे, सामाजिक पायाभूत सुविधा इ. संबंधीची माहितीहि मिळेल.”
लागीकोण ॲप आणि वेबसाइट विकसित करणाऱ्या जेनोरा इन्फोटेकचे सीईओ मिलिंद प्रभू म्हणाले, ” लागीकोण हा आमच्यासाठी अतिशय प्रिय प्रकल्प आहे. प्रकल्प गोव्यातील ग्राहकांसाठी विकसित करण्यात आला आहे आणि त्यामुळे विकास कार्यसंघाचा एक भाग असल्याचे आम्हाला समाधान आहे. या अद्भुत संधीसाठी आम्ही प्रवर्तकांचे आभारी आहोत.”लागीकोण बिझनेस डिरेक्टरी ॲप आणि वेबसायटच मडगाव येथे उदघाटन ; मडगाव मार्केट बनल गोव्यातील पहिल डिजिटल मार्केट
लागीकोण ॲप आणि वेबसाइट विकसित करणाऱ्या जेनोरा इन्फोटेकचे सीईओ मिलिंद प्रभू म्हणाले, ” लागीकोण हा आमच्यासाठी अतिशय प्रिय प्रकल्प आहे. प्रकल्प गोव्यातील ग्राहकांसाठी विकसित करण्यात आला आहे आणि त्यामुळे विकास कार्यसंघाचा एक भाग असल्याचे आम्हाला समाधान आहे. या अद्भुत संधीसाठी आम्ही प्रवर्तकांचे आभारी आहोत.”