Connect with us

गोवा खबर

इफ्फी-53 मधील संभाषण सत्रात ‘आशयाचे भविष्य’चा वेध

Published

on

Spread the love

गोवा खबर : इफ्फी 53 मध्ये इन-कन्व्हर्सेशन सत्रात संबोधित करताना, प्रख्यात संगीतकार ए. आर. रेहमान यांनी “मी AI आहे” असे सांगून, नवीन डिजिटल युगाच्या अस्तित्वाच्या प्रश्नाचे उत्तर दिले. होय, एआर आणि एआयमध्ये फरक असणार नाही कारण दोन्ही कालानुरूप  विकसित होत आहेत  आणि उत्तम प्रगती करत आहेत, असे रेहमान म्हणाले.

तंत्रज्ञातले बदल आत्मसात करण्यासाठी  मानवाचे नैतिक अधिष्ठान मजबूत असायला हवे, असे रेहमान यांनी ‘तंत्रज्ञान आणि मानवी मूल्ये यांमधील संघर्ष’ या विषयावरील चर्चेदरम्यान सांगितले.

आपले मन हे वैश्विक जागृतावस्थेशी नकळत जोडलेले आहे आणि आपल्याला त्या सर्वोच्च शक्तीकडूनच काहीतरी निर्माण करण्याची प्रेरणा मिळत असते, असे त्यांनी संगीताच्या प्रेरणेविषयी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना सांगितले.

आपला सांगीतिक प्रवास हा ए आय अर्थात कृत्रिम बुद्धिमत्तेसारखाच आहे, त्याचप्रमाणे विकसित होत आहे, असे रेहमान म्हणतात. ज्याप्रमाणे ए आय तंत्रज्ञानाची दिवसेंदिवस अधिक उत्कृष्टतेकडे प्रगती होत आहे, त्याचप्रमाणे मी मोठा झालो आणि एक संगीतकार म्हणून हळूहळू घडत गेलो, असे ते म्हणाले.

प्रख्यात नवोन्मेषी  आणि कृत्रिम बुद्धिमत्ता, आभासी वास्तव आणि रोबोटिक्समधील अग्रणी, प्रणव मिस्त्री  यांनी यावेळी मेटाव्हर्सच्या संकल्पनेबद्दल माहिती दिली.  मेटाव्हर्सची स्पष्ट व्याख्या सांगता येणार नाही, हे एक रीब्रँडिंग आहे जे एका  प्रणाली द्वारे  इमर्सिव्ह व्हिडिओ तंत्रज्ञानाच्या  अनुभवांची अनुभूती  देते; हे 3D तंत्रज्ञानासारखे नाही तर ते  3D तंत्रज्ञानापेक्षा प्रभावी आणि प्रेक्षकांना त्यांच्या अवतीभवती चित्रपट घडतो आहे, असा अनुभव देणारे तंत्रज्ञान आहे ” असे त्यांनी सांगितले.

मानवाने  यापूर्वी केलेली एखादी गोष्ट, एखादे यंत्र करू ही  शकेल, मात्र कोणतेही यंत्र मनुष्याला पडणारे  प्रश्न आणि त्याची जिज्ञासा आत्मसात करू शकत नाही, असे मिस्त्री म्हणाले.

आंतरराष्ट्रीय ख्यातीचे दिग्दर्शक शेखर कपूर यांनी या संभाषणात सहभाग घेतला. ए आय आपल्याला एक पर्याय असू शकतो का ही भीती नसून आपण नव्या तंत्रज्ञानाला आत्मसात करू शकतो का हा प्रश्न मला सतावतो आहे, असे ते म्हणाले. “एआय कथा-कथन करू  शकते, परंतु आपण  एआय ला आशा, भीती आणि मानवी भावना दाखवणे  शिकवू शकतो का?”

मानवी मेंदू हे सर्वात शक्तिशाली यंत्र असून मानव जे काही करू शकतो ते करण्याची क्षमता असणारे तंत्रज्ञान अजून खूप दूर आहे, असे ड्रीमस्पेस इमर्सिव्हचे सह-संस्थापक रोनाल्ड मेंझेल, चित्रपट रसिकांशी संवाद साधताना म्हणाले

जनसामान्यांसाठी आशयघन कलाकृतीची निर्मिती करतेवेळी  तंत्रज्ञानाचा वापर करताना नेहमीच एक सीमारेषा आणि मर्यादा असावी, असे मत  या समारोप सत्रात सहभागी वक्त्यांनी व्यक्त केले.

सत्यजित रे चित्रपट आणि दूरचित्रवाणी संस्था ( एस आर एफ टी आय आयI), भारतीय राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळ ( एन एफ डी सी), भारतीय चित्रपट आणि दूरचित्रवाणी संस्था ( एफ टी आय आय ) आणि एंटरटेनमेंट सोसायटी ऑफ गोवा ( इ एस जी )  द्वारे इफ्फी53 मध्ये मास्टरक्लास आणि संभाषण सत्रे संयुक्तपणे आयोजित केली जात आहेत.

Continue Reading