देश खबर: मुख्यमंत्र्यांनी गोवा हस्तकला ग्रामीण आणि लघू उध्योग विकास महामंडळाची बैठक घेऊन महामंडळाच्या बळकटीकरणासंबंधी विविध मुद्द्यांवर चर्चा केली. पर्यटन भवन, पणजी येथे झालेल्या बैठकीला गोवा हस्तकला ग्रामीण आणि लघू उध्योग विकास महामंडळाचे अध्यक्ष प्रवीण आर्लेकर बौठकीस उपस्थित होते.
बैठकीत गोवा हस्तकला ग्रामीण आणि लघू उध्योग विकास महामंडळाच्या वाढीशी संबंधित विविध मुद्द्यांवर चर्चा झाली. डॉ. सावंत यांनी गोवा हस्तकला ग्रामीण आणि लघू उध्योग विकास महामंडळाद्वारे राबविलेल्या विविध योजना आणि उपक्रमांचा आढावा घेत महामंडळाला बळकटी देण्यासाठी विविध महसुलाभिमुख सेवांची अंमलबजावणी करण्याचे आणि समावेश करण्याचे आदेश दिले.
या बैठकीत स्थानिक कारागिरांसाठी चरखा आणि मातीची चाके चालविण्यासाठी प्रशिक्षण कार्यक्रम घेण्याचा निर्णय घेण्यात आला ज्यामुळे ग्रामीण भागात रोजगार निर्मिती होईल.

मुख्यमंत्र्यांनी हस्तकला विभागाच्या समन्वयाने कॉयर आधारित व्यावसायिक उपक्रमांच्या उन्नतीसाठी विविध कार्यक्रम सुरू करण्याचे आदेश गोवा हस्तकला ग्रामीण आणि लघू उध्योग विकास महामंडळाला दिले.
राज्यात लिज्जत पापड केंद्र स्थापन करून स्थानिक महिलांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याबाबत चर्चा करण्यात आली. हस्तकला खात्याचे संचालक श्री अरविंद बुगडे, गोवा हस्तकला ग्रामीण आणि लघू उध्योग विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक श्रीमती दर्शना नारूलकर, खादी आणि ग्रामोध्योग आयोगाचे संचालक श्री शिरीष तांबे आणि इतर अधिकारी यावेळी उपस्थित होते.