Connect with us

गोवा खबर

मध्यवर्ती वाचनालयात उन्हाळी शिबीर संपन्न

Published

on

Spread the love

गोवा खबर: गोवा राज्य मध्यवर्ती वाचनालयाने मुलांमध्ये वाचनाची सवय लावण्यासाठी आणि समाजात वाचन संस्कृतीला प्रोत्साहन देण्यासाठी केंद्रीय ग्रंथालयाच्या मुलांच्या विभागासाठी उन्हाळी शिबीराचे आयोजन केले होते.

हा कार्यक्रम ९ मे २०२२ ते १३ मे २०२२ या कालावधीत बहुउद्देशीय हॉल, संस्कृती भवन, पाट्टो, पणजी, गोवा येथे विविध उपक्रमांसह पूर्ण उत्साहात साजरा करण्यात आला.

उद्घाटन कार्यक्रम ९ मे २०२२ रोजी कला आणि संस्कृती संचालक श्री. सगुण वेळीप, उप. संचालक आणि क्युरेटर/प्रभारी श्री. अशोक परब, सहा. राज्य ग्रंथपाल श्रीमती. सुलक्षा कोलमुले यांच्या उपस्थितीत संपन्न झाला.

पाच दिवसांच्या कार्यक्रमात कथाकथन, मॅजिक शो, गेम्स आणि क्विझ, वर्क इट आऊट आणि पपेट शो यांचा समावेश होता ज्यामुळे मुलांच्या व्यक्तिमत्त्व विकासाला चालना मिळाली. या कार्यक्रमात दररोज सुमारे ६० मुले सहभागी होत होती.