गोवा खबर:गुगल ट्रान्सलेटमध्ये आता कोकणी भाषेचाही समावेश झाला आहे. याशिवाय 24 नव्या भाषांचा समावेश झाल्याची माहिती गुगलने दिली. यामध्ये 8 भारतीय भाषा आहेत.
आसामी, भोजपुरी, संस्कृत, डोंगरी, मैथिली, मणिपुरी आणि मिझो या भाषाही ट्रान्सलेटमध्ये असतील.
मध्यभारतात जवळपास 20 लाख लोक कोकणी भाषेचा वापर करतात. त्यामुळे गुगलने कोकणी भाषेचा समावेश केलेला आहे.
भारताची प्राचीन भाषा म्हणून प्रचिलीत असलेल्या संस्कृतचाही गुगल ट्रान्सलेटमध्ये समावेश करण्यात आला आहे. याबाबत बोलताना गुगल रिसर्चचे वरिष्ठ सॉफ्टवेअर अभियंता, आयझॅक कॅसवेल म्हणाले, “संस्कृत भाषेचा गुगल ट्रान्सलेटमध्ये समावेश करण्यासाठी आम्हाला अनेक लोकांनी विनंती केली होती. याचबरोबर आम्ही ईशान्य भारतातील भाषांचा देखील समावेश केला आहे.”सध्या गुगल ट्रान्सलेटमध्ये एकूण 19 भारतीय भाषा आहेत.