Connect with us

गोवा खबर

गोवा फाइल्सची रणनीती फसल्यावर भाजप “कर्नाटक फाइल्स” व्दारे फूट पाडण्याच्या प्रयत्नात: आप

Published

on

Spread the love
गोवा खबर:पंचायत निवडणुकीसाठी केवळ कन्नडिगा उमेदवारांना पाठिंबा देण्याच्या कन्नड महासंघाच्या नेत्यांच्या वक्तव्यावर आम आदमी पक्षाने आक्षेप घेतला असून याला सामाजिक फूट आणि वाद निर्माण करण्याचा प्रयत्न असल्याचे म्हटले आहे. 
आपचे नेते अॅड. अमित पालेकर म्हणाले की, “ग्रामपंचायती या आपल्या लोकशाहीचा तळागाळातील घटक आहेत. त्यामुळे गोव्यातील पंचायत निवडणुका या एकमेव निवडणुका आहेत ज्या पक्षाच्या आधारावर घेतल्या जात नाहीत, जेणेकरून आमचा तळागाळातील लोक राजकीय आणि इतर प्रभावापासून दूर राहतील”.
“प्रत्येकजण निवडणूक लढवण्यास स्वतंत्र आहे, पण लढण्यामागील हेतू जनतेची सेवा हाच असला पाहिजे. केवळ विशिष्ट भाषा बोलणारे किंवा मूळतः विशिष्ट राज्यातील लोकांचीच नव्हे तर सर्व लोकांची सेवा करणे. भाषिक किंवा प्रादेशिक आधारावर मते मिळविण्याचे असे प्रयत्न अयोग्य आहे.” पालेकर म्हणाले.
पालेकर म्हणाले की, “भाजपला आगामी निवडणुकीत पराभवाचे वेध लागले आहे. त्यामुळे ते प्रशासनातील अपयशापासून लोकांचे लक्ष विचलित करण्यासाठी विविध डावपेच आखत आहेत. भाजप गोवा फाइल्सच्या वादातून गोमंतकीयांना धार्मिक धर्तीवर विभाजित करण्यात अयशस्वी ठरले आहे. त्यामुळे आता “कर्नाटक फाइल्स” रणनीतीने प्रादेशिक आणि भाषिक आधारावर काही पंचायत क्षेत्रातील मतदारांना विभाजित करण्याचा प्रयत्न भाजप करत आहे का, असा प्रश्न पडतो”.
कन्नड महासंघाच्या नेत्यांनी भाजपच्या या डावपेचातून स्वतःला दूर ठेवले पाहिजे. भाजप हा पक्ष केवळ व्होटबँकेचा फायदा घेऊन सत्तेत येण्यासाठी आणि भ्रष्टाचार करण्यासाठी फूट पाडण्याचे डावपेच वापरतो.
सर्व गोमंतकीयांनी असे फूट पाडण्याच्या डावपेचात अडकू नये आणि एकजुटीने भ्रष्टाचार न करता विकास करणाऱ्या उमेदवाराला निवडून आणावे असे आवाहन पालेकर यांनी केले.