Connect with us

गोवा खबर

रिलायन्‍स फाऊंडेशन व याकुल्‍ट सहयोगाने रिलायन्‍स फाऊंडेशन यंग चॅम्‍प्‍स विद्वानांच्‍या सर्वांगीण विकासाला साह्य करणार

Published

on

Spread the love

गोवा खबर: रिलायन्‍स फाऊंडेशन ही रिलायन्‍स इंडस्‍ट्रीज लि. (आरआयएल)ची सीएसआर शाखा आणि याकुल्‍ट डॅनोन इंडिया प्रा. लि. ही जॅपनीज व फ्रेंच संयुक्त उद्यम कंपनीद्वारे प्रोबायोटिक्स व त्याच्या संबंधित क्लिनिकल संशोधन संस्थांमधील जागतिक अग्रणी कंपनी यांनी रिलायन्‍स फाऊंडेशन यंग चॅम्‍प्‍स (आरएफवायसी) सोबत सहयोगाची घोषणा केली. हा सहयोग आरएफवायसी विद्वानांना आशियातील आंतरराष्ट्रीय युवा फुटबॉल स्पर्धांमध्ये प्रवेश शक्य करेल. याकुल्ट टीम प्रोबायोटिक्स व पोषणाबद्दलचे ज्ञान शेअर करण्यासाठी संस्थेतील कोचिंग आणि परफॉर्मन्‍स टीम्‍ससोबत काम करेल, ज्यामुळे विद्वानांच्या सर्वांगीण विकासाला हातभार लागेल.

तसेच आरएफवायसी विद्वानांना आशियातील वेगवेगळ्या वयोगटातील स्पर्धांमध्ये भाग घेण्याची, त्यांच्या वयोगटातील क्लब फुटबॉलपटूंसोबत अनुभव, प्रशिक्षण आणि ज्ञान संयुक्तपणे शेअर करण्याची संधी मिळेल. या करारामुळे जपान आणि भारत यांच्यातील क्रीडाविषयक ज्ञानाची देवाणघेवाण होण्यास मदत होईल, ज्यामुळे युवा खेळाडूंच्या विकासामध्‍ये मदत होईल. आरएफवायसी टीम गतकाळात भारत आणि इंग्लंडमधील प्रीमियर लीगमधील संघांविरुद्ध खेळली आहे. ऑक्टोबर २०२२ मध्ये, आरएफवायसी टीम्‍सनी मलेशिया सुपरमोख कप २०२२ मध्ये भाग घेतला. या स्‍पर्धेमध्‍ये टीम्‍स युरोपियन, आसियान व जॅपनीज युवा संघांविरूद्ध खेळल्‍या. अंडर १७ आरएफवायसी टीम २०२३ मध्‍ये जपानमधील उच्‍च स्‍तरीय अंडर १७ स्‍पर्धा सॅनिक्‍स इंटरनॅशनल कप स्‍पर्धेत भाग घेण्यासाठी जपानला जाणार आहे.

आपले मत व्‍यक्‍त करत याकुल्‍ट डॅनोन इंडिया प्रा. लि. चे व्‍यवस्‍थापकीय संचालक श्री. हिरोशी हमदा म्‍हणाले, “भारतातील तरुण प्रतिभेला प्रोत्साहन देण्यासाठी रिलायन्स फाऊंडेशनसोबत भागीदारी करताना आम्हाला आनंद होत आहे. जगभरातील लोकांचे आरोग्‍य व आनंदाप्रती योगदान देण्याच्या आमच्या कॉर्पोरेट तत्त्वज्ञानाशी सुसंगत असलेल्या रिलायन्स फाऊंडेशनसोबत सहयोगाने आम्ही आता भारतातील तरुणांचे आरोग्य सुधारण्याप्रती उत्‍सुक आहोत.’’

“अशा सीएसआर उपक्रमांद्वारे आम्ही जपान व मलेशिया येथील फुटबॉल इकोसिस्टममधील विविध भागधारकांसोबत कार्यकारी संबंध विकसित केले आहेत आणि आता भारतातील रिलायन्स फाऊंडेशन यंग चॅम्प्स उपक्रमाच्या तरुण प्रतिभावान खेळाडूंच्या फायद्यासाठी त्याचा लाभ घेण्याचा प्रयत्न करत आहोत.’’

“आम्‍ही आमचे सिग्‍नेचर याकुल्‍ट उत्‍पादन देऊ आणि त्‍याचे वैज्ञानिकदृष्‍ट्या प्रमाणित आरोग्‍यविषयक फायदे शेअर करू, जे रिलायन्‍स फाऊंडेशन यंग चॅम्‍प्‍स उपक्रमाचे खेळाडू व कर्मचाऱ्यांसह अॅथलीट्ससाठी त्‍यांची रोगप्रतिकारशक्‍ती उत्तम राखण्‍यामध्‍ये, सर्वांगीण आरोग्‍य सुधारण्‍यामध्‍ये आणि संसर्गांचा धोका कमी करण्‍यामध्‍ये मदत करण्‍यासाठी सर्वाधिक संबंधित आहेत,’’ असे श्री. हमदा पुढे म्‍हणाले.

रिलायन्स फाऊंडेशन यंग चॅम्प्स हा उपक्रम प्रतिभावान तरुण फुटबॉलपटूंना ओळखण्याच्या आणि त्यांना मैदानावर व मैदानाबाहेर त्यांची क्षमता शोधण्यासाठी एक उत्कृष्ट व अनुकूल वातावरण प्रदान करण्याच्या दृष्टीकोनावर आधारित आहे. रिलायन्स फाऊंडेशनचे संपूर्ण पाठबळ असलेले आरएफवायसी दरवर्षी संपूर्ण वर्षभर चाललेल्या स्काउटिंग प्रक्रियेनंतर देशभरातील तरुण प्रतिभांना संपूर्ण शिष्यवृत्ती देते.

यावर्षी, मिझोराम फुटबॉल असोसिएशन आणि आरएफवायसी यांनी राज्‍यातील रिलायन्स फाऊंडेशन यंग चॅम्प्स (आरएफवायसी) नौपांग (चिल्ड्रेन) लीगच्या माध्यमातून तळागाळापर्यंत संपूर्ण हायपर-लोकल मार्ग व विकेंद्रित फुटबॉलचा विस्तार, परिवर्तन आणि निर्मिती करण्यासाठी सहयोग केला आहे.

मुंबईतील आरएफवायसी अकॅडमी अत्‍याधुनिक सुविधांसह सुसज्‍ज आहे आणि अकॅडमीमध्‍ये समर्पित बहु-शिस्‍तबद्ध पूर्ण वेळ कर्मचारी आहेत. आरएफवायसी सध्‍या देशभरातील पाच वयोगटांमध्‍ये (अंडर १४, अंडर १५, अंडर १६, अंडर १७ व अंडर १९) खेळणाऱ्या मुलांची यजमानी आहे.