गोवा खबर: कला आणि संस्कृती खात्यातर्फे संगीत/नृत्य, नाटक/तियात्र, लोककला, क्रिएटिव्ह फोटोग्राफी, चित्रकला, हस्तकला, शिल्पकला, भजन/कीर्तन, साहित्य आणि चित्रपट या क्षेत्रात उत्कृष्ट आणि असामान्य योगदान दिलेल्या गोव्यातील तरुणांना “युवा सृजन पुरस्कार (नवसर्जन-चेतना पुरस्कार)” अंतर्गत सन्मानित करण्यात येईल.
यावर्षी युवा सृजन (नवसर्जन चेतना पुरस्कार) २०२२-२३ पुरस्कारासाठी एकूण सहा युवा व्यक्तिमत्त्वांची निवड करण्यात आली आहे, ते पुढीलप्रमाणे- श्री. यतीन उ. शेणवी तळावलीकर, संगीत क्षेत्र, नाट्यक्षेत्रासाठी श्रीमती.आरती दीपक गावडे, मिस. मीना हेलॉन गोईंस तियात्र, लोककला क्षेत्रासाठी श्री. महेश अ. सतरकर, श्री. वासुदेव शेट्ये आणि श्री. गणेश शंकर शेटकर ललित कला आणि छायाचित्रण क्षेत्र.
पुरस्कार विजेत्यांना स्मृतीचिन्ह, प्रशस्तीपत्र आणि रु. २५,०००/- ची आर्थिक पर्स देऊन गौरविण्यात येणार आहे.
खात्यातर्फे आयोजित करण्यात येणाऱ्या विशेष समारंभात युवा सृजन पुरस्कार (नवसर्जन-चेतना पुरस्कार) विजेत्यांना प्रदान करण्यात येईल. खात्याकडून लवकरच कार्यक्रमाची तारीख जाहीर केली जाईल.