– दापोलीच्या सिद्धेश बर्जे आणि वास्कोच्या सपना पटेल यांनी जिंकली हाफ मॅरेथॉन

गोवा खबर: रविवारी वास्कोजवळील चिखली येथे झालेल्या १२व्या एसकेएफ गोवा नदी मॅरेथॉनमध्ये इथिओपियाच्या अदिन्यू मेकोनेन आणि रायपूर (छत्तीसगड) येथील सतोविशा समाजदार यांनी अनुक्रमे पुरुष आणि महिलांची ४२ किलोमीटर पूर्ण मॅरेथॉन जिंकली.
अदिन्यूने अतिशय जलद २: ४१ :१८ वेळेत तर सतोविशाने ४:०९: ४२ वेळेत मॅरेथॉन पूर्ण केली. २१ किमी अर्ध मॅरेथॉन शर्यतीत दापोली (महाराष्ट्र) च्या सिद्धेश बर्जे आणि वास्को (गोवा) च्या सपना पटेल यांनी अनुक्रमे पुरुष आणि महिला गटात विजेतेपद पटकावले.
सिद्धेशने १:१३:३८ वेळ नोंदवली आणि नुकत्याच आयर्नमॅन ७०.३ गोवा चॅम्पियन ठरलेल्या निहाल बेगला केवळ १२ सेकंदांनी मागे टाकले, तर सपनाने१:३१:२१ वेळ घेतला.
१० किमी खुल्या गटात कोल्हापूरच्या प्रधान किरुळकरने ३४:१० मिनिटांच्या वेळेसह आणि बेंगळुरूच्या फरहीन फिरदोसने ४२:१६ मिनिटांच्या वेळेसह शर्यतीच्या पुरुष आणि महिला गटात विजेतेपद पटकावले.

नव्याने सादर करण्यात आलेल्या १५ वर्षाखालील वयोगटातील ५ किमी आंतरशालेय गटात मुरगाव हायस्कूलने मुलांच्या सांघिक स्पर्धेत, तर विद्या विहार हायस्कूलने मुलींच्या सांघिक स्पर्धेत विजेतेपद पटकावले. मुरगाव हायस्कूलचा विकास पाल हा ५ किमी गटात२०:५९ मिनिटात पूर्ण करत वेगवान मुलगा ठरला, तर मुरगाव हायस्कूलचा अचल गिरी हा २९:५९ मिनिटात पूर्ण करत वेगवान मुलगी ठरला.
शर्यतीचे निकाल:
पुरुषांची पूर्ण मॅरेथॉन (४२ किमी)
1) अदिन्यू मेकोनेन (इथिओपिया) २:४१:१८
2) विनायक जांबोटकर (बेळगावी) २:५४:१०
3) नीलेश कुळये (लांजा, महाराष्ट्र) २:५५:१६
महिला पूर्ण मॅरेथॉन (४२ किमी)
1)सतोविशा समाजदार (रायपूर) ४:०९:४२
२) नेत्रा पेलपकर (पुणे) ४:१५:०८
३) जसमिथा कोडेनकिरी (मंगळुरु) ४:४२:२२
पुरुषांची हाफ मॅरेथॉन (२१ किमी)
१) सिद्धेश बर्जे (दापोली, महाराष्ट्र) १:१३:३८
2) निहाल बेग (पुणे) १:१३:५०
3) टेडी कार्डोझो (वास्को) १:१७:३५
महिलांची हाफ मॅरेथॉन (२१ किमी)
१) सपना पटेल (वास्को) १:३१:२१
२) सिम्ता शर्मा (बेंगळुरू) १:४०:१७
3) शिल्पा केंबळे (दापोली) १:४१:१३
पुरुष 10 किमी
1)प्रधान किरुळकर (कोल्हापूर) ३४:१०
2) हरिचंद्र वेळीप (करचोरेम, गोवा) ३८:०४
३) बुलबुल अली (गुवाहाटी) ३९:१४
महिला १० किमी
1) फरहीन फिरदोस (बेंगळुरू) ४२:१६
२) शिवानी चौरसिया (प्रयागराज, उत्तर प्रदेश) ४२:३३
३) निकिता मार्ले (विक्रमगड, महाराष्ट्र) ४४:४६
शाळा ५ किमी सांघिक स्पर्धा (मुले)
1) मुरगाव हायस्कूल (१:३०:०८ )
2) विद्या विहार हायस्कूल (१:३५:००)
३) माउंट लिटेरा झी शाळा (१:४७:००)
शाळा ५ किमी सांघिक स्पर्धा (मुली)
१) विद्या विहार एचएस (२:०८:२२)
२) मुरगाव एचएस (२:१४:४८)
३) केशव स्मृती एच.एस. (२:१७:५९)