Connect with us

क्रीडा खबर

अल्वारोच्या फॉर्मनेआनंदी, भविष्यात तो खूप गोल करेल: नोहा सदाउई

Published

on

Spread the love

 

 

गोवा खबर: इंडियन सुपर लीगमध्ये (आयएसएल) एफसी गोवासाठी गोल करण्यासाठी अल्वारो वॅझक्वेझला थोडी प्रतीक्षा करावी लागली. परंतु यापुढे तो टीमसाठी खूप गोल करेल, असा विश्वास मोरोक्कोवचा आंतरराष्ट्रीय फुटबाॉलपटू नोह सदाउई याने व्यक्त केला आहे. शनिवारी साखळी सामन्यात गौर्सनी ओदिशा एफसीवर 3-0 अशा मोठ्या फरकाने विजय मिळवला. त्यातील तिसरा गोल हा वाझक्वेझ याचा होता. हा गोल करण्यासाठी त्याला सदाउई याची मदत (असिस्ट) झाली.

 

एफसी गोवाचा प्रमुख खेळाडू सदाउई यानेही ओदिशा एफसीविरुद्ध गोल करताना आयएसएलमधील गोलसंख्या पाचवर नेली. मात्र, आणखी एक संधी मिळाल्यावर त्याने स्पेनच्या सहकार्‍याकडे अचूक पास देण्याला प्राधान्य दिले.

 

एफसी गोवासाठी गोल करता आल्याने अल्वारो (वॅझक्वेझ) आनंदी आहे. त्याला फॉर्म मिळाला म्हणून आम्हीही आनंदी आहोत. चाहत्यांप्रमाणेच आम्ही सर्वजण या क्षणाची वाट पाहत होतो. त्याने यापूर्वी, गोल केला नसला तरी सांघिक खेळ उंचावण्यात त्याचे योगदान होते. सांघिक खेळ उंचावण्यात त्याचे वैयक्तिक योगदान राहिले, ही आमच्यासाठी आनंदाची गोष्ट आहे, असे सदाउई याने सामना संपल्यानंतर एफसीगोवाडॉटइनला सांगितले.

 

अल्वारो खरोखर कठोर परिश्रम करत होता. त्यामुळे यापुढे तो आणखी गोल करेल. सांघिक खेळ उंचावण्यासाठी प्रत्येक जण सर्वोत्तम योगदान देत आहे, असे तो पुढे म्हणाला.

आम्हाला असे सामने आणखी खेळायचे आहेत

जगरनॉट्सविरुद्धच्या एफसी गोवाच्या विजयात नोह सदाउईने महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.वॅझक्वेझने गोल करतानाच ब्रिसन फर्नांडिसला गोल करण्यासाठी असिस्ट केले. सर्वोत्तम प्रयत्नांमुळे त्याला इंडियन सुपर लीग (खडङ) 2022-23 सीझनसाठी त्याला दुसरा ’हिरो ऑफ द मॅच’ पुरस्कार मिळाला.

 

सांघिक खेळ उंचावण्यात योगदान देता आल्याबद्दल मला खूप आनंद झाला. पण सर्वात महत्त्वाचे म्हणजे, आमचा खेळ उंचावलला आणि तीन गुण मिळवले.आणि हे सर्व इतकेच आहे की, आम्हाला ओदिशासारखे आणखी सामने खेळायचे आहेत, असे 29 वर्षीय सदाउई याने पुढे सांगितले.

 

शनिवारच्या लढतीपूर्वी, आम्ही शेवटचे दोन सामने गमावले होते आणि आमच्यासाठी तो कठीण काळ होता. पहिल्या हाफमध्ये आमचा खेळ चांगला नव्हता. कारण त्यावेळी आमचा आत्मविश्वास उंचावलेला नव्हता. पण याचे श्रेय सर्वांना जाते. आम्ही टीम गेम केला. प्रत्येकावर विश्वास ठेवला. कठोर परिश्रम केले. शिवाय प्रशिक्षक कार्लोस पेना यांच्या सूचनांचे पालन केले. सदाउईने हाफ टाईममध्ये ड्रेसिंग रूममध्ये टीम टॉकवरही खुलासा केला आणि विजयातही त्याची भूमिका कशी होती यावर प्रकाश टाकला.

 

फक्त स्वतःवर विश्वास ठेवा, असे प्रशिक्षक कार्लोस (पेना) यांनी आम्हाला सांगितले. प्रत्येक सामन्यात प्रत्येकाकडून गोल शक्य नाही. माझ्या मते, आम्ही बचावही चांगला करत होतो. मात्र, उत्तरार्धात अनेक संधी मिळतील, असे पेना यांनी आम्हाला शाश्वत केले होते. ज्या प्रत्यक्षात घडल्या आणि आम्ही त्यांचा फायदा घेऊ शकलो, असे त्याने स्पष्ट केले.

 

ओदिशा एफसीविरुद्धच्या विजयामुळे एफसी गोवाने गुणसंख्या 15वर नेताना आयएसएल पॉइंट्स टेबलमध्ये पाचवे स्थान मिळवले. त्यांचा यंदाच्या हंगामातील होमग्राउंडवरील चार सामन्यांतील हा तिसरा विजय आहे.