गोवा खबर: १२ व्या एसकेएफ गोवा रिव्हर मॅरेथॉनच्या “विमेन रन द वर्ल्ड” थीमचे गोव्यासह देशभरातील महिला धावपटूंनी कौतुक केले आहे. १० किमी, २१ किमी आणि ४२ किमीच्या स्पर्धात्मक शर्यतींसाठी भारत आणि गोव्यातील धावपटूंना आकर्षित करणारी लोकप्रिय धावण्याची ही स्पर्धा रविवार ११ डिसेंबर रोजी चिखली येथे होणार आहे.
मुंबईची धावपटू डॉली डिसोझा (४८) म्हणाल्या की, “जेव्हा महिला धावतात तेव्हा त्यांचा आत्मविश्वास वाढण्यास मदत होते. तसेच त्यांचे दिसणे आणि अनुभवण्याची पद्धत सुधारते आणि त्यांचे वजनही राखण्यास मदत होते.”
नऊ वर्षांपासून धावणाऱ्या डॉली यांच्या मते घर, काम आणि प्रवास या सर्व जबाबदाऱ्या लक्षात घेऊन मॅरेथॉन धावणे हे महिला मॅरेथॉनर्ससाठी नेहमीच आव्हान असते.
नौदल अधिकाऱ्याची पत्नी असणाऱ्या आणि सध्या गोव्यात राहणाऱ्या वर्षा दाबास (२८) म्हणतात की, “एसकेएफ गोवा रिव्हर मॅरेथॉन भावनिकदृष्ट्या माझ्या खूप जवळची आहे .कारण ती धावण्यासाठी माझे पुनरागमन आहे. कॉर्पोरेट जगताशी जुळवून घेत असताना, कोविड आणि लग्न करताना, धावणे मागे पडले होते. या मॅरेथॉनसाठी धावताना आणि तयारी करताना मला आनंद होत आहे.” त्यांच्या मते, अधिक महिलांनी धावणे सुरू केले पाहिजे. “माझी इच्छा आहे की प्रत्येक स्त्रीने अंतिम रेषेच्या गर्दीचा साक्षीदार व्हावा कारण एकदा तुम्ही ती ओलांडली की, आता तुम्ही पहिल्या सारख्या व्यक्ती राहणार नाही,”.
पुणे येथील धावपटू आणि प्रशिक्षक स्वरूपा भडसावळे (५२) यांनीही महिलांनी धावलेच पाहिजे असेच मत व्यक्त केले. त्या म्हणाल्या “सर्व वयोगटातील महिलांनी धावले पाहिजे. धावणे शारीरिक अस्वस्थता, भावनिक उलथापालथ यातून प्रवास करण्यास मदत करते आणि मानसिक शक्ती निर्माण करते,”. स्वरूपा शर्यतीच्या दिवसाची वाट पाहत आहेत . “एसकेएफ गोवा रिव्हर मॅरेथॉन माझ्या हृदयाच्या जवळ आहे कारण मी माझी पहिली हाफ मॅरेथॉन २०१३ मध्ये येथेच धावली होती.”
शेवटी, दाबोळी गोवा येथील शेरियन डौराडो (४९) म्हणाल्या की, “महिलांनी मॅरेथॉनमध्ये भाग घेणे महत्त्वाचे आहे कारण एकदा त्यांनी अंतिम रेषा ओलांडली की, ते त्यांना यशाची आणि अभिमानाची भावना देते.”
शेरिअन शर्यतीच्या दिवसाची वाट पाहत आहेत. त्या म्हणाला, “मी २०१६ मध्ये गोवा रिव्हर मॅरेथॉनमध्ये धावण्यास सुरुवात केली आणि कधीही मागे वळून पाहिले नाही.”
शर्यतीसाठी नोंदणी करण्यासाठी www.skfgoarivermarathon.com या संकेतस्थळावर भेट द्या