Connect with us

गोवा खबर

कळंगुट मधील 2 बेकायदा डान्स बार मधील छम छम पंचायती कडून बंद

Published

on

Spread the love
 गोवा खबर:पर्यटनाच्या आडून सुरु असलेल्या गैरधंद्यां विरोधात सरकारने कडक मोहिम सुरु केली आहे. या पार्श्वभूमीवर स्थानिकां कडून आलेल्या तक्रारींची गंभीर दखल घेत कळंगुट ग्रामपंचायतीने वाढत असलेल्या बेकायदा कृत्यांवर आळा म्हणून डान्सबारवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला.
त्यावर कृती करत पंचायतीने सोमवारी रात्री उशिरा दोन डान्सबार कारवाई करून असले प्रकार यापुढे खपवून घेतले जाणार नाहीत,असा इशारा दिला आहे.
 कळंगुट पंचायतीने घेतलेल्या निर्णानुसार 5 डिसेंबर रोजी रात्री दोन डान्सबार सील केले. यामध्ये खोब्रावाडा येथील थ्री किंग्ज प्रीमियम व डेवील या डान्सबारचा समावेश आहे.
 या डान्सबारकडून नियमांचे उल्लंघन होत असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर पंचायतीने कारवाई करण्याचा निर्णय घेतला. आणि ही कारवाई करण्यात आली आहे. यापुढेही अवैध कृत्यांना आळा घालण्यासाठी कारवाईचा सुरुच ठेवणार असल्याचे पंचायतीने स्पष्ट केले आहे.
कळंगुट पंचायतीने  4 डिसेंबर रोजी बेकायदा डान्सबारवर कायमची बंदी घालण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती दिली. याबाबत माहिती देताना कळंगुटचे सरपंच जोजफ सिक्वेरा म्हणाले की, सोमवारपासून बेकायदा डान्सबारवर कायमची बंदी आणण्यात येत आहे.
कळंगुट येथे दोन दिवसांपुर्वी कर्नाटकी तरुणांकडून स्थानिक तरुणांना मारहाण झाली आहे. असे प्रकार पुन्हा होऊ नयेत यासाठी बेकायदा कृत्यांना आळा घालण्यासाठीचे पहिले पाऊल म्हणून हा निर्णय घ्यावा लागत असल्याचे म्हटले आहे.