गोवा खबर:आशियातील सर्वात मोठा दुचाकी इच्छुकांचा कार्यक्रम इंडिया बाईक वीक ह्याचा समारोप झाला असून या वर्षी कार्यक्रमात एकूण १०,००० लोकांची हजेरी होती. तर ह्या कार्यक्रमात मोटारसायकलवरील त्यांचे सामाईक प्रेम साजरे करण्यासाठी स्मदेशभरातील सहभागी गोव्यात आले होते.
कार्यक्रमाच्या दुसऱ्या दिवशी दुचाकी चालकांचे स्वागत करण्यात आले आणि संगीतापासून ते मोटरस्पोर्टस् पर्यंतच्या अनोख्या क्युरेट केलेल्या कार्यक्रमाचा अनुभव त्यांना देण्यात आला. आईबीडब्लु ट्रॅक मास्टर नेली आणि विशाक यांनी सहभागींना तेच इव्हेंटच्या मूलभूत गोष्टींबद्दल शिक्षित केले, तसेच शार्दुल शास शर्मा – रेड बुल रोमानीयाक स्पर्धेत भाग घेणारा पहिला भारतीय याने रेड डी हिमालय, इंडियन नॅशनल रेलिंग चॅम्पियनशिप जोबा रॅली आपले अनुभव आणि तांत्रिक टिप्स शेअर केल्या.
ह्या कार्यक्रमाची ठळक वैशिष्टे म्हणजे हिमालयन ८२२ चा लाँच, हारली डेविडसन नाईटस्टर, बी एम डब्लु १००० आरआर चे पूर्वावलोकन, केटीएम अरसी कप घोषणेसह केटीएमचे नवीन पावर वेअर लाँच, यासोबत ब्रँड मारुती सुझुकीने ट्रॅकवर सर्व पकड तंत्रण्यानाची चाचणी केली, तसेच सर्वोत्कृष्ट हेल्मेट ब्रँड एकझोर ने आपल्या ऑफ – रोडींग हेल्मेटची नवीन श्रेणी पण लाँच केली.
कार्यक्रमात भारतातून विविध भागातील बाईक कॉम्यूनिटीझ जेमसन कनेक्ट हाऊलिंग बार येथे आपले रायडिंग अनुभव करण्यास एकत्रित आले होते , ज्यात मुर्तुझा जूनैद, योगी चाबोरिया, मार्को रोसेटो आणि श्रीशेंडू ही प्रसिद्ध नावे उपस्थित होती.
दुचाकी आधारित कार्यक्रम असूनही इथ संगीत इच्छुकांना पण एक उत्कृष्ट अनुभवाचा कार्यक्रम होता ज्यात लगोरी आणि तेरी मिको हे हेडलाईन ॲक्ट्स होते, या मेळाव्यात पेट्रोनास – स्प्रिंटा यांनी किंग सोबत हाथ गाठून रायडर अँथम २.० लाँच केला. कार्यक्रमात आपल्याला रेड बुल् द्वारे हीप होपचा पण समावेश दिसण्यात आला.
इंडिया बाईक वीक आणि पेट्रोनास स्प्रिंटा यांनी उर्वशी पाटोळे, समीरा दहिया, कल्याणी पोतेकर – कलैवानी आणि दिव्या संधू या आघाडीच्या महिला बाइकर्सचे आयोजन केले होते. पेट्रोनास स्प्रिंटा बिग ट्रीप येथील एका सत्रात मारल याझार्लू पॅट्रिक द्वारा संचालित, या महिलांनी त्यांचे अनोखे बाइकिंग अनुभव, अलीकडच्या राइड्स, महिला बाईकर्सबद्दलचे मिथक आणि देशातील महिला बाइकर्सचे भविष्य शेअर केले.
बिग फॉर्कर्स मीट, भारतातील मांस क्युरिंग, ग्रिलिंग, स्मोकिंग आणि बरबेक्युईंग या कलेसाठी समर्पित विभागातील शेफ आल (नागालँड), ग्रिलिंग शेफ अर्जुन सिकदार (गोवा) शेफ ज्योफ(कॅनडा), शेफ ओनाल (कोची) आणि शेफ ख्रिस (गोवा) यांसारख्या काउंटीमधील काही नामांकित शेफच्या पाककौशल्यांचा अनुभव उपस्थिकंना अनुभवता आला.
इट स्ट्रीट मध्ये १० इतर स्थानिक गोवा केटरर्स आणि फूड ट्रक त्यांच्या मेन्यूमध्ये वैशिष्ट्यपूर्ण आईबीडबलू २०२२ मध्ये महत्वाची भागीदारी करत होते.
तर कार्यक्रमाच्या संदर्भात बोलताना फेस्टीव्हल डायरेक्टर मार्टिन दा कॉस्ता आपली भावना व्यक्त करीत म्हणाले की “ मोटर सायकल आणि मोटर सायकलवरील प्रेम हे त्यांचे वय , लिंग पश्र्वभूनी यापेक्षा ज्यास्त आहे. इंडिया बाईक वीक हे साक्षीदार होण्यासाठी योग्य व्यासपीठ आहे आणि ८ व्या आवृत्तीसह, उत्सवाने ३ वर्षांच्या दीर्घ कालावधीनंतर सायकल चालविण्याची उत्कटता साजरी केली.