Connect with us

गोवा खबर

‘आनंदी आयुष्य जगण्यासाठी प्रत्येक व्यक्तीला असते आधाराची गरज’

Published

on

Spread the love

गोवा खबर : आपण आपल्या वडिलांसाठी जगातील सर्वोत्तम गोष्टी करत आहोत अशा भावनेने वागणारा, काहीसा अधिकार गाजवणारा, अंकुश ठेवणारा  मुलगा एकीकडे आपल्या वृद्ध वडिलांवर बंधनं लादण्याचा प्रयत्न करत असतो. तर दुसरीकडे आपल्या अपूर्ण स्वप्नांची पूर्तता करून समाधानाने जीवन जगू पाहणाऱ्या वडिलांना हवे असते एक टॉनिक, म्हणजेच आनंदी आयुष्य जगण्यासाठी एक आधार.. ‘आयुष्यात टॉनिक असेल तर जग जिंकता येईल’ असे  वडील म्हणतात.

53 व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (IFFI) भारतीय पॅनोरमा विभागात प्रदर्शित झालेल्या बंगाली फीचर फिल्म ‘टॉनिक’मध्ये, नायकाला प्रतीकात्मकरित्या ‘टॉनिक’ असे नाव देण्यात आले आहे कारण तो ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या  जीवनाचा आनंद घेता यावा यासाठी आवश्यक   असलेला आधार आणि आत्मविश्वास प्रदान करतो.

आनंदी आयुष्य जगण्यासाठी प्रत्येक व्यक्तीला एका आधाराची गरज असते, ही या चित्रपटाची मूलभूत संकल्पना  आहे, असे या चित्रपटाचे दिग्दर्शक, भारतीय चित्रपट आणि दूरचित्रवाणी संस्था (एफ टी आय आय) चे शिक्षण विभागाचे माजी प्रभारी, सत्यजित रे चित्रपट आणि दूरचित्रवाणी संस्था ( एस आर एफ टी आय आयI) चे पदवीधर  दिग्दर्शक अविजित सेन यांनी आज गोवा इथं इफ्फी मध्ये टेबल टॉक चर्चासत्रादरम्यान सांगितले. त्यांना या चित्रपटाला असे  एक आकर्षक शीर्षक द्यायचे होते  ज्यातून या चित्रपटाची कथाकल्पना स्पष्ट  होईल, आणि म्हणूनच  त्यांनी ‘टॉनिक’ हे नाव निवडले, असे त्यांनी सांगितले.

या चित्रपटातील नायक साकारणारे अभिनेते देव यांनी देखील या चर्चासत्रात सहभाग घेतला. हा चित्रपट मानवी भावभावनांवर आधारित आहे, आपल्या पालकांच्या इच्छा, आकांक्षा आणि स्वप्नांकडे दुर्लक्ष करणार्‍या आजच्या युगातल्या अति संरक्षणात्मक आणि अवाजवी चिंता करणाऱ्या पिढीचे यथार्थ चित्रण यामध्ये आहे, असे त्यांनी सांगितले.

हा चित्रपट गेल्या वर्षी महामारीनंतरच्या काळात चित्रपटगृहांमध्ये सातत्याने 111 दिवस प्रदर्शित करण्यात आला. महामारीनंतरच्या काळात फार कमी चित्रपटांना असे यश मिळाले असे अभिनेता देव यांनी सांगितले.

   

जिथे अनेक दिग्गजांचे उत्कृष्ट चित्रपट दाखवले जातात अशा इफ्फी सारख्या प्रतिष्ठित महोत्सवात, आपला चित्रपट प्रदर्शित झाल्यामुले  आपण भाग्यवान असल्याची भावना  ‘टॉनिक’ च्या  टीमने व्यक्त केली.

ओटीटी मंचामुळे भारतीय प्रादेशिक चित्रपटांना जागतिक स्तरावरील प्रेक्षक सहजरीत्या लाभले असले तरी आपला चित्रपट, अगदी एक दिवस का होईना मोठ्या पडद्यावर झळकावा अशी  प्रत्येक चित्रपट निर्माता किंवा निर्मातीच्या मनातली सुप्त इच्छा असते, असे मत देव यांनी चित्रपट माध्यम या विषयावर बोलताना व्यक्त केले.  “चित्रपट  72 एमएमसाठी बनवला जातो. चित्रपट  मोठ्या पडद्यासाठी बनवला जातो.”

सेवानिवृत्त आणि सत्तरीच्या घरात असलेले  जलधर सेन, त्यांची पत्नी, मुलगा, सून आणि नातवासोबत राहत असतात. त्यांच्या मुलाची हुकूमशाही वृत्ती आणि अति काळजी करण्याच्या स्वभावामुळे घरात मतभेद होतात, जलधर परदेशी सहलीची योजना आखातात  आणि टॉनिक नावाच्या ट्रॅव्हल एजंटशी त्यांची भेट होते.  जो नंतर त्यांच्या आयुष्यात एक चमत्कार घडवून आणतो. त्यांचा परदेश दौरा रद्द झाल्याने हे वृद्ध जोडपं  आपल्या मुलाला न सांगता दार्जिलिंगला जाण्याची योजना आखातात  पण जलधर तिथे गेल्यावर आजारी पडतात.

Continue Reading