Connect with us

गोवा खबर

‘अकॅडमी कलर एनकोडिंग सिस्टिम’वरील मास्टरक्लासला उत्स्फूर्त प्रतिसाद

Published

on

Spread the love

गोवा खबर : गोव्यात सुरु असलेल्या 53 व्या इफ्फीमधे 26 नोव्हेंबर 2022 रोजी, ‘अकॅडमी कलर एनकोडिंग सिस्टिम’ चे उपाध्यक्ष आणि एचडीआर कंटेट वर्कफ्लो चे प्रमुख, जो आचिम झेल आणि ग्लोबल एसीईएस अडॉप्श् न प्रमुख स्टीव्ह तोबेनकिन यांनी एसीईएस म्हणजे ‘अकॅडमी कलर एनकोडिंग सिस्टिम’ या विषयावरील मास्टरक्लास मध्ये मार्गदर्शन केले.

यावेळी, जोआचिम झेल यांनी एसीईएस वर्कफ्लो  यावर सादरीकरण केले. एसीईएस व्यवस्थेत, कशाप्रकारे,  एक सामाईक कलर स्पेस निश्चित केली जाते, त्यासाठी व्यापक रंगसंगती आणि गतिमान रंगसंगतीची निवड कशी केली जाते, हे त्यांनी दाखवलं. एसीईएस प्रणालीशी संबंधित तंत्रज्ञानाची देखील त्यांनी विस्तृत माहिती दिली. यात, रेफरन्स रेंडरिंग ट्रान्सफॉर्म (RRT), ACES कलर एन्कोडिंग्स, ACES व्हर्च्युअल उत्पादन, वॉल कॅलिब्रेशन, इंटर-कटिंग सामग्री इत्यादींचा समावेश होता.

अकॅडमी कलर एनकोडिंग सिस्टिम’ ही प्रणाली कोणत्याही चलचित्राचे किंवा दूरचित्रवाणीसाठीच्या कार्यक्रमातील, रंगसंगतीचे व्यवस्थापन आणि त्याचे कायम जतन करतांना, त्याचे रंग जपून ठेवणारी प्रणाली आहे. एखाडे दृश्य कॅमेरात बंदिस्त केल्यापासून, ते संकलन, व्हीएफएक्स, मास्टरिंग, सार्वजनिक सादरीकरण, त्याचे जतन करणे आणि भविष्यात ते सांभाळून ठेवणे अशा सगळ्या गोष्टींची काळजी यात घेतली जाते. याचे सृजनात्मक लाभ तर आहेतच, त्याशिवाय, एसीईएस, चित्रपटाची निर्मिती, निर्मिती पश्चात येणारे प्रश्न, डिलिव्हरी, आणि चित्रफित जतन करण्यात येत असलेल्या सर्व समस्यांचे समाधानही करते. आज, डिजिटल कॅमेरा आणि विविध फॉरमॅट आले असतांना, तसेच जगभरात चित्रनिर्मिती प्रचंड प्रमाणात सुरु असतांना, डिजिटल इमेजच्या फाइल्स जतन करण्याचे काम या प्रणालीद्वारे केले जाते.

स्टीव्ह टोबेंकिन यांनी ACES वर आपल्या कल्पना शेअर करताना सांगितले की अकादमी कलर एन्कोडिंग सिस्टीम (ACES) डिजिटल इमेज फाइल्सची अदलाबदल करण्यासाठी, रंग कार्यप्रवाह व्यवस्थापित करण्यासाठी आणि वितरण आणि संग्रहणासाठी मास्टर्स तयार करण्यासाठीचे जागतिक स्तरावरील प्रमाणीकरण मानक आहे. ACES हे SMPTE मानके, सर्वोत्तम पद्धती आणि अत्याधुनिक रंग विज्ञान यांचे संयोजन आहे जे अकादमी ऑफ मोशन पिक्चर आर्ट्स अँड सायन्सेसच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान परिषदेच्या अंतर्गत शेकडो व्यावसायिक चित्रपट निर्माते आणि रंग शास्त्रज्ञांनी विकसित केले आहे, अशी माहितीही त्यांनी दिली.

सिनेछायाचित्रणात एसीईएसचे महत्त्व समजावून सांगतांना स्टीव्ह यांनी सांगितले, की चित्रपटाची निर्मिती, पोस्ट-प्रोडक्शन आणि संग्रहण  या सर्व काळात  उच्च स्तरावर आपल्या उत्पादनाची रंगसंगती राखून, ही प्रणाली रंग व्यवस्थापन प्रमाणित आणि सुलभ करते. एवढेच नाही, तर ही प्रणाली, रंग आणि कार्यप्रवाह संप्रेषण सुधारते; कलर व्ह्यूइंग पाइपलाइनमध्ये रंग संगतीची विश्वासार्हता वाढवते, आउटपुटची निर्मिती सुलभ करते आणि “भविष्यात जतन करता येईल अशी चित्रफित बनवण्यास मदत करते.

महत्त्वाचे म्हणजे, ACES ही मोफत  आणि मुक्त प्रणाली आहे, त्यामुळे डझनभर कंपन्यांनी त्याचा वापर केला आहे. आणि त्याच्या प्रमाणित फ्रेमवर्कच्या शीर्षस्थानी सतत नाविन्य आणले आहे, असे स्टीव्ह टोबेंकिन यांनी सत्रादरम्यान सांगितले.

सत्राच्या शेवटी, वक्त्यानी चित्रपट निर्माते, सिनेछायाचित्रकार आणि इतरांच्या प्रश्नाची उत्तरे दिलीत.

सत्राचे सूत्रसंचालन ऑस्कर अकादमीचे सदस्य आणि SMPTE-इंडियाचे अध्यक्ष उज्वल निरगुडकर यांनी केले.

सत्यजित रे फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट (SRFTI), NFDC, फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया (FTII) आणि ESG द्वारे IFFI 53 मधील मास्टरक्लास आणि इन-कॉन्व्हर्सेशन सत्रे संयुक्तपणे आयोजित केली जात आहेत. विद्यार्थी आणि चित्रपट रसिकांना चित्रपट सृष्टीच्या प्रत्येक पैलूत प्रोत्साहन देण्यासाठी या वर्षी मास्टरक्लास आणि इन-कॉन्व्हर्सेशन्सची एकूण 23 सत्रे आयोजित केली जात आहेत.

Continue Reading