Connect with us

गोवा खबर

इफ्फी 53 चा फिल्म पर्सनॅलिटी ऑफ द इयर पुरस्कार मेगास्टार चिरंजीवी यांना जाहीर

Published

on

Spread the love

 

 

 गोवा खबर:चिरंजीवी. होय, 2022 चा इफ्फी इंडियन फिल्म पर्सनॅलिटी ऑफ द इयर पुरस्कार मेगास्टार आणि अभिनेता-निर्माता चिरंजीवी कोनिडेला यांना देण्यात येत आहे. गोव्यामध्ये आज झालेल्या 53 व्या इफ्फी, अर्थात भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या दिमाखदार उद्घाटन समारंभात केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग सिंह ठाकूर यांनी ही घोषणा केली आणि .  

इफ्फी महोत्सवाच्या उद्घाटन समारंभामध्ये केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्र्यांनी हा पुरस्कार जाहीर केला, त्यावेळी केंद्रीय माहिती आणि प्रसारण राज्य मंत्री डॉ. एल. मुरुगन व्यासपीठावर उपस्थित होते.

हा पुरस्कार म्हणजे, सर्वाधिक लोकप्रिय असलेल्या या मेगास्टारने सिनेमा, लोकप्रिय संस्कृती आणि सामाजिक दृष्ट्‍या महत्वाच्या कलात्मक कामामध्ये दिलेल्या योगदानाबद्दल देशाने दिलेला सन्मान आहे .

 

चिरंजीवी एक प्रख्यात भारतीय अभिनेता, नर्तक, चित्रपट निर्माता, आवाजाच्या जगतातील कलाकार तसंच सेवाभावी  आणि राजकारणी अशी बहुआयामी ओळख असलेलं व्यक्तिमत्व. त्यांनी प्रामुख्यानं तेलेगु सिनेमातांतून काम केलेलं असलं तरी, हिंदी, कन्नड आणि तमिळ भाषांमध्येही त्यांनी आपल्या अभिनयाची कमाल दाखवसी आहे.

आपल्या जवळपास चार दशकांच्या प्रदीर्घ कारकिर्दीत, त्यांनी 150 हून अधि चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या आहेत.

कलाकार म्हणून त्यांच्या प्रतिभेचा गौरव म्हणून आजवर असंख्य प्रतिष्ठित पुरस्कारांनी सन्मानित केलं गेलं आहे. यात पद्मभूषण भारताच्या तिसरा सर्वोच्च नागरी पुरस्कारासह, रघुपती व्यंकय्या पुरस्कार या आंध्र प्रदेश राज्य सरकारच्या सर्वोच्च पुरस्काराचा तसंच नंदी पुरस्कारासह इतर असंख्य पुरस्कारांचा समावेश आहे. चिरंजीवी यांनी 1978 मध्ये ‘पुनाधिराल्लू’ या चित्रपटातून पदार्पण केलं होतं.

1982 साली आलेल्या ‘इंतलो रामय्या वीदिलों कृष्णय्या’ या चित्रपटात भूनिका साकारतांना, त्यांनी केलोल्या अभिनयातून जनमानसाच्या भावनांचे परतिबिंबच उमटले होते.  त्यांचं भारावून टाकणारं नृत्य कौशल्य आणि हाणामारीच्या प्रसंगांमध्ये ताकदीचं दर्शन घडवणारी त्यांच्या कलाकारीनं त्यांना प्रचंड लोकप्रियता मिळवून दिली.

त्यांनी 1998 मध्ये “द चिरंजीवी चॅरिटेबल फाऊंडेशन” या संस्थेची स्थापना केली. या संस्थेच्या माध्यमातून ते सेवाभावी कामांमध्ये सक्रिय सहभाग घेत असतात. आपल्या व्यक्तिमत्वातल्या या नानाविध पैलुंनीच चिरंजिवी यांना ‘मेगास्टार’ हे पदवी मिळवून दिली आहे.

वहिदा रहमान, रजनीकांत, इलैयाराजा, एस.पी. बालसुब्रह्मण्यम, अमिताभ बच्चन, सलीम खान, बिस्वजित चॅटर्जी, हेमा मालिनी आणि प्रसून जोशी यांसारख्या दिग्गज चित्रपट कर्मींना यापूर्वी या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे

 

Continue Reading