Connect with us

क्रीडा खबर

पणजी जिमखाना मेंबर्स लीगचा लिलाव शनिवारी : लिलावासाठी यंदा १४८ खेळाडूंची नोंदणी, प्रायॉरिटी टायटन्स आणि आरसी गोवा हे दोन नवीन संघ

Published

on

Spread the love

 

 

गोवा खबर:पणजी जिमखाना मेंबर्स लीग आपल्या दुसऱ्या हंगामाचा पुनरागमन करण्यास सज्ज आहे. ह्या लीगची लिलाव प्रक्रिया शनिवारी दि. १९ नोव्हेंबर ऐवजी पणजी जिमखाना येथे होणार आहे. लीगच्या लिलाव प्रक्रियेसाठी १४८ खेळाडूंनी नोंदणी केली आहे, ज्यांना मार्की आणि सामान्य श्रेणींमध्ये विभागले गेले  आहे, तसेच पणजी जिमखाना मेंबर्स लीगची दुसरी आवृत्ती जिंकण्यासाठी सहा संघ खेळपट्टीवर वर्चस्वासाठी लढतील.

लीगच्या गव्हर्निंग काऊन्सिलने निवडलेल्या प्रक्रियेनुसार मानस मॅवेरिक्स, बाले टायगर्स, प्रेसकॉन पँथर्स, डेम्पो चॅलेंजर्स, प्रायॉरिटी टायटन्स आणि आरसी गोवा हे सहा संघ ही लीग खेळणार. प्रायॉरिटी टायटन्स आणि आरसी गोवा हे दोन संघ लीगमध्ये प्रवेश करणारे नवीन संघ आहेत.

तर लिलाव प्रक्रियेसाठी प्रत्येक संघाला २.५ कोटी गुणांची किटी दिली जाईल ज्याचा वापर बोलीद्वारे खेळाडू विकत घेण्यासाठी करावा लागेल. विद्यमान संघ २ खेळाडूंना रीटेन करू शकतात तसेच सर्व संघ बोली  प्रक्रियेद्वारे इतर खेळाडूंव्यतिरिक्त ०२ मार्की खेळाडू जोडू शकतात, तर प्रत्येक संघ २० खेळाडूंची खरेदी करू शकतात व त्यातील १७ खेळाडूंना लीगमध्ये खेळणार.

पीजीएमएलची पहिली आवृत्ती मोठ्या प्रमाणात यशस्वी झाली असून ही लीग आपल्या दुसऱ्या हंगामात मोठे आणि चांगले अनुभव देण्याचे वाचन देत आहे असे पणजी जिमखाना अध्यक्ष श्री. मनोज काकुलो यांनी नोंदविले. पणजी जिमखान्याने ही नावीन्यपूर्ण  स्वरूप आणि संकल्पना सादर केली आहे, जी गोव्यातील नवोदित क्रिकेटपटूंना भरभराट करण्यास आणि दृश्यमान होण्यास मदत करेल.