Connect with us

गोवा खबर

नवी दिल्लीतील  प्रगती मैदानावर गोवा पॅव्हेलियनला उत्स्फूर्त प्रतिसाद

Published

on

Spread the love

गोवा खबर:नवी दिल्लीतील ४१व्या भारतीय आंतरराष्ट्रीय व्यापार मेळाव्यात गोवा राज्य पॅव्हेलियनाला (दालनाला)  मेळावा सुरु झाल्यापासून विशेषत: दिल्ली आणि लगतच्या राज्यांतून अभ्यागतांचा उदंड प्रतिसाद मिळत आहे. या १४ दिवसांच्या कार्यक्रमाची २७ नोव्हेंबर रोजी समाप्ती होणार असून, तोवर अधिक संख्येने लोक भेट देतील अशी अपेक्षा आहे.

गोवा पॅव्हेलियनमध्ये येणाऱ्यांच्या संख्येत झालेली हि वाढ मुख्यत्वे दोन प्रमुख कारणांमुळे आहे.  यामध्ये हस्तशिल्प, वस्त्रोद्योग आणि कॉयर विभागाशी संलग्न कारागीरांचा सहभाग आहे, जे आयआयटीएफ च्या ‘व्होकल फॉर लोकल, लोकल टू ग्लोबल’ या विषयाला आधारून, त्यांच्या उत्पादनांची विक्री करत आहेत.

गोव्यातील दालनाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळण्याचे दुसरे प्रमुख कारण म्हणजे, गोव्यातील कला संगम, प्रियोळ या संस्थेशी संलग्न कलाकार दररोज गोव्यातील पारंपारिक लोकनृत्ये जसे कि, दिवली नृत्य, धनगर आणि वीरभद्र सादर करत आहेत. हे कलाकार लोककलेच्या सादरीकरणातून आपल्या कलात्मक प्रतिभेने, पाहणाऱ्यांचे मनोरंजन करून, त्यांना मंत्रमुग्ध करत आहेत. त्यांच्या सादरीकरणाचे साक्षीदार होणारे, या कलाकारांचे कौतुक करून टाळ्यांचा कडकडाट करताना दिसतात.

गोवा पॅव्हेलियनचे वैशिष्ट्य म्हणजे, ‘स्वयंपूर्ण गोवा – आत्मनिर्भर भारत’ मोहिमेच्या अनुषंगाने ‘स्वयंपूर्ण गोवा’ अंतर्गत निर्धारित उद्दिष्टे साध्य करण्याच्या दिशेने वाटचाल आणि स्वयंपूर्ण गोवा सुरू करण्यासाठी दृष्टी, गतिशीलता आणि सक्षम नेतृत्व केल्याबद्दल, पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांनी गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचे कौतुक केले आहे.

या व्यतिरिक्त, प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक प्रसार माध्यमांद्वारे विविध क्षेत्रांतील उपलब्धी, पुढाकार आणि मिळवलेली प्रगती देखील, योग्य दृष्टीकोनातून ठळकपणे बाहेरील जगापर्यंत पोहोचण्यावर भर दिला आहे. त्याचप्रमाणे, या दालनांना भेट देणाऱ्यांना राज्य आणि येथील लोकांच्या हितासाठी कल्याणकारी उपायांबद्दल, माहिती दिली जाते.  गुंतवणुकदारांना उद्योग उभारण्यासाठी दिलेल्या संधी आणि प्रोत्साहनांचे पॅकेज तसेच देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय पर्यटकांसाठी विस्तारित सुविधांवरही गोवा पॅव्हेलियनमध्ये प्रकाश टाकला जात आहे.

Continue Reading