गोवा खबर:गोवा टीएमसीची राज्य समिती सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात घोषित केली जाईल. माझे 95 टक्के पेक्षा जास्त समर्थक आणि कार्यकर्ते पंचायत स्तरावर सदस्य म्हणून निवडून आले आहेत,असा दावा टीएमसी नेते समिल वळवईकर यांनी आज केला.
या वेळी वळवईकर यांनी पंचायतींचे नवनिर्वाचित सरपंच,उपसरपंच आणि पंचांचे अभिनंदन केले आणि त्यांना त्यांच्या संबंधित गावांचा विकास करण्यासाठी आणि लोकांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी काम करण्याचे आवाहन केले.पंच म्हणून निवडून आल्याबद्दल टीएमसी सदस्यांच्या यशावर प्रकाश टाकून ते म्हणाले, ‘त्यांच्या यशामुळे आम्हाला खूप आनंद होतो आणि आम्ही त्यांना शुभेच्छा देतो.’
गोवा तृणमूल काँग्रेसचे नेते मारियानो रॉड्रिग्स यांनी गोव्याचे मुख्य बिशप फिलिप नेरी फेराव आणि हैदराबादचे मुख्य बिशप यांचे अभिनंदन केले.