Connect with us

गोवा खबर

गोव्याच्या निर्यातीला चालना देण्यासाठी गोवा सरकारच्या सामंजस्य करारावर सह्या

Published

on

Spread the love

गोवा खबर:गोवा सरकारच्या उद्योग, व्यापार आणि वाणिज्य संचालनालयाने गोव्यातून निर्यात वाढविण्याच्या प्रयत्नात नेव्हेटीज सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेड सोबत गोव्याच्या निर्यातीला प्रोत्साहन देण्यासाठी आणि राज्यासाठी निर्यात महसूल वाढविण्यासाठी उत्पादन, व्यापार, वस्तू आणि सेवा या दोन्ही क्षेत्रांमध्ये सामंजस्य करारावर सह्या केल्या आहेत.  या सामंजस्य कराराचा उद्देश म्हणजे महत्त्वाच्या क्षेत्रांची ओळख करून आणि आवश्यक डेटा विश्लेषण, मार्केट इंटेलिजन्स आणि त्यांना खरेदीदार शोधण्यात आणि निर्यात वाढविण्यासाठी मदत करून कंपनीमार्फत गोव्यातील व्यवसायांना पाठिंबा देऊन त्यांचा निर्यात महसूल वाढविण्यासाठी समर्थन देणे असा आहे.

नेव्हेटीज सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचे बंगळुरू येथे नोंदणीकृत कार्यालय असून डेटा अॅनालिटिक्स, तंत्रज्ञान आणि एंगेजमेंट टूल्समध्ये कौशल्य आहे जे गोव्याच्या व्यवसायांना नवीन बाजारपेठेची उपलब्धता समजून घेण्यास मदत करील, कोणत्या बाजारपेठांमध्ये अधिक चांगली क्षमता आहे याचे विश्लेषण करण्यात आणि खरेदीदार, आयातदार शोधण्यासाठीही मदत करील.  विद्यमान निर्यातदार किंवा निर्यात करू इच्छिणाऱ्या व्यवसायांसाठी नवीन किंवा आंतरराष्ट्रीय बाजारपेठ शोधण्यासही मदत करील.

या सामंजस्य कराराच्या व्याप्ती अंतर्गत कंपनी आणि सरकार सध्या निर्यात करत असलेल्या क्षेत्रांची ओळख करून देणे, सध्या निर्यात करत असलेले संभाव्य उद्योग, व्यवसाय ओळखणे किंवा निर्यात करण्याची क्षमता, गोमंतकीयांमा मदत करणारे कार्यक्रम तयार करणे या दिशेने कार्य करतील. राज्यातून व्यवसाय वाढवून खाजगी क्षेत्रात रोजगार वाढवण्याच्या सरकारच्या प्रयत्नांच्या पार्श्वभूमीवर हे पाऊल उचलण्यात आले आहे. भारत सरकारच्या वाणिज्य मंत्रालयाने प्रकाशित केलेल्या नवीनतम इज ऑफ डुईंग बिझिनेस क्रमवारीत राज्याने आठव्या क्रमांकावर झेप घेतली आहे. या सामंजस्य करारामुळे गोव्यातील अधिकाधिक व्यवसायांना त्यांच्या उत्पादनांसाठी आणि सेवांसाठी नवीन बाजारपेठ शोधण्यासाठी अत्यंत आवश्यक कौशल्य आणि तांत्रिक सहाय्य उपलब्ध केले जाईल अशी अपेक्षा आहे.