Connect with us

गोवा खबर

कोविडचा सामना करण्यासाठी पंतप्रधान मोदी यांचा राज्यांना सतर्कतेचा इशारा

Published

on

Spread the love

गोवा खबर:प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज गोव्यासह विविध राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत घेतलेल्या व्हिडिओ कॉन्फरन्समध्ये कोविडचा सामना करण्यासाठी केंद्र आणि राज्यांनी एकत्रितपणे काम करण्याच्या महत्त्वावर भर दिला.

प्रधानमंत्र्यांनी केंद्र आणि राज्य यांच्यातील मजबूत संबंधामुळेच देशातील पूर्वीच्या कोविड लाटांचा सामना करण्यात महत्त्वाची भूमिका बजाविली होती असे सांगितले.

यावेळी मुख्यमंत्र्यांसमवेत आरोग्यमंत्री श्री विश्वजित राणे, मुख्य सचिव पुनीतकुमार गोयल आयएएस, मुख्यमंत्र्यांचे सचिव अजित रॉय, आयएएस आदी उपस्थित होते.

श्री मोदींनी कोविड योद्ध्यांच्या प्रयत्नांचे कौतुक केले आणि काही राज्यांमध्ये प्रकरणे वाढत असताना सतर्क राहण्याची आणि सामूहिक, सक्रिय आणि प्रतिबंधात्मक कार्यात काम करण्याची गरज व्यक्त केली.

श्री मोदी यांनी मनुष्यबळ वाढविणे आणि आरोग्याच्या पायाभूत सुविधा कार्यान्वित करण्याकडे लक्ष देणे आवश्यक आहे  असे सांगितले.

देशातील लसीकरण कार्यक्रमाची प्रशंसा करताना कोविडपासून सुरक्षित राहण्यासाठी लसीकरण हे एक महत्त्वाचे साधन आहे यावर भर देत प्रधानमंत्र्यांनी ६-१२ वयोगटातील मुलांना लस देण्यासाठी शाळांमध्ये लसीकरण कार्यक्रम राबविण्याची गरज व्यक्त केली.