Connect with us

गोवा खबर

‘परफेक्ट नंबर’ या पोलिश चित्रपटाच्या आंतरराष्ट्रीय प्रीमियरने इफ्फीची सांगता

Published

on

Spread the love


या चित्रपटाचा संदेश हा आहे, की जगात अशाही समस्या असतात ज्या भौतिक जगाशी संबंधित असतीलच असे नाही: दिग्दर्शक क्रीझटॉफ झानुसी

 

 

 गोवा खबर:पोलिश चित्रपट निर्माते क्रीझटॉफ झानुसी यांचा गूढपट ‘परफेक्ट नंबर’ च्या आंतरराष्ट्रीय प्रीमियरने गोव्यात ५३व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाची म्हणजे इफ्फीची सांगता झाली. 

“या चित्रपटाचा संदेश असा आहे, की जगात अशाही समस्या असतात ज्या भौतिक जगाशी संबंधित असतीलच असे नाही,” असे प्रतिपादन परफेक्ट नंबर चित्रपटाचे दिग्दर्शक क्रीझटॉफ झानुसी यांनी  त्या आधी केले.53 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवा (इफ्फी) च्या समारोप समारंभा आधी  आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. भौतिक जगापेक्षा वेगळे काहीतरी सत्य अस्तित्वात असू शकते, असे ते म्हणाले. आणि विज्ञानदेखील हे आता नाकारत नाही, कारण क्वांटम भौतीक्षास्त्राने हे मान्य केले आहे की न्यूटनचा काळ आता संपला आहे आणि ज्या गोष्टींबद्दल आपण 19 व्या शतकात ठाम होतो, त्याबाबत आपण आता तितके ठाम नाही. या सगळ्यांवर आता एक प्रश्नचिन्ह लागले आहे, कदाचित याच प्रेरणेतून मी हा चित्रपट बनवीला असेल, असे ते म्हणाले.

 

या चित्रपटात क्वांटम भौतीक्षास्त्राच्या गणतीय सिद्धांत आणि कॅल्क्युलस याची उत्तरे शोधण्यासाठी भौतिकशास्त्राच्या सीमा ओलांडण्याचा प्रयत्न केला जातो, जिथे विज्ञान आणि कल्पना एकत्र येतात. हा चित्रपट एका तरुण गणितज्ञाविषयी आहे जो अनेक वर्षांनी आपल्या श्रीमंत चुलत भावाला भेटतो आणि या भेटीनंतर त्याचे आयुष्य अनेक प्रकारे बदलून जाते.

या चित्रपटामागच्या प्रेरणेबद्दल बोलताना क्रीझटॉफ झानुसी म्हणाले, “हा चित्रपट एका खऱ्या माणसावरून प्रेरित आहे. सेंट पीटर्सबर्गमध्ये एक गणितज्ञ राहत असतो, रशीयन ज्यू ज्याला 1 दशलक्ष डॉलरचा पुरस्कार मिळतो. तो गणितज्ञ हा पुरस्कार नाकारतो आणि चेक परत पाठवतो, कारण यामुळे त्याचे लक्ष विचलित होईल असे त्याला वाटते, जे त्याला नको असते.”

“म्हणून, मला असे वाटते की, अनेक शतके पैशाच्या मागे धावल्यानंतर, कदाचित आता, मानव अधिक प्रगल्भ होत आहे, आणि त्याच्या हे लक्षात येत आहे की पैसा असणे महात्वाचे नाही, आणि आपल्या इतर समस्या आहेत, ज्या कदाचित अधिक महत्वाच्या आणि मनोरंजक आहेत,” ते म्हणाले.

श्रद्धा  आणि विज्ञान यांच्यातील विरोधाभास, जी परफेक्ट नंबरची मध्यवर्ती कल्पना आहे, या बद्दल विचारले असता, क्रीझटॉफ झानुसी म्हणाले, “हा एक खुला प्रश्न आहे. आपण जिवंत असेपर्यंत आपल्याला हे समजणारच नाही, की मृत्यूच्या पलीकडे काही आहे की नाही. मला अशा आहे, की मृत्युच्या पलीकडे देखील एक जग असावे. हा आशावाद आहे, जी श्रद्धा  आहे.”

क्रिझिस्टोफ झानुसी यांनी आपल्या व्याखेत होत असलेली प्रगती आणि त्यात सतत होत जाणारे बदल याविषयी बोलतांना सांगितलं, की 20 वर्षांआधी जी प्रगती मानली जात असे, ती आता प्रगती म्हणत नाही, “ आपल्याला आता प्रगतीची नवी व्याख्या तयार करायला हवी. किंवा असे म्हणूया की, मानवतेचे नवे उद्दिष्ट- केवळ आपले अस्तित्व टिकवून ठेवणे. कारण आज कारण आपण निर्माण केलेल्या पर्यावरणीय आपत्तीमुळे आणि आपणच निर्माण केलेल्या शस्त्रांमुळे या ग्रहावरील आपल्या अस्तित्वालाच धोका निर्माण झाला आहे.  आणि आपली शस्त्रे आत्म-नाशाची साधने ठरू शकतात, असे झानुसी यांनी सांगितले.

क्रिझिस्टोफ झानुसी यांनी असेही निरीक्षण नोंदवले की, “सर्व प्राण्यांमध्ये मनुष्य हा इतर स्वतःचा विनाश करणारा प्राणी आहे, ही गोष्ट मला खूप त्रास देते. आणि कदाचित हेच मी चित्रपटात मांडण्याचा प्रयत्न केला असावा. जगाच्या भवितव्याबद्दल माझी चिंता आणि मानवतेची भावना वाढेल हे सुनिश्चित करण्यासाठी काय करावे हेच मी यातून मांडले आहे.”

 

‘परफेक्ट नंबर’ विषयी:  

दिग्दर्शक: क्रिझिस्टोफ झानुसी

निर्माता: Zbigniew Domagalski, Felice Farina, Paolo Maria Spina

पटकथा: क्रिझिस्टोफ झानुसी

सिनेमॅटोग्राफर: पिओटर निमिज्स्की

संपादक: मिलेनिया फिडलर

कलाकार: आंद्रेज सेवेरिन, जान मार्कझेव्स्की

 

कथासार:

आयुष्य कशामुळे अर्थपूर्ण होतं? यश की प्रेम, या द्विधा मनःस्थितीत, सापडला आहे, जोआकिम, आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यात असलेला आणि एक परिपूर्ण आयुष्य जगलेला माणूस आणि एक तरुण गणिती प्रतिभावान डेव्हिड. ‘द परफेक्ट नंबर’ मध्ये, झानुसी त्यांच्या आधीच्या चित्रपटांच्या मध्यवर्ती संकल्पनेकडे परत आले आहेत, ज्यांचा त्यांनी ‘क्रिस्टल स्ट्रक्चर’ आणि ‘इल्युमिनेशन’ सारख्या क्लासिक्स कलाकृतींमध्ये शोध घेतला होता. मात्र यावेळी दिलेली उत्तरे स्पष्ट नाहीत. डेव्हिड हा एक तरुण गणितज्ञ-भौतिकशास्त्रज्ञ त्याच्या वैज्ञानिक संशोधनात आणि विषय शिकवण्यात मग्न आहे. तर, जोआकिम, एक वृद्ध ज्यू-पोलिश त्याच्या हयातीत जमा झालेली संपत्ती आपला चुलत भाऊ, डेव्हिडला दान देऊ इच्छितो, मात्र, डेव्हिड ही ऑफर नाकारतो कारण त्याला गरीब पण आनंदी राहायचे आहे. मात्र, डेव्हिड खूप श्रीमंत झाला आहे, अशी खोटी  बातमी शहरात सगळीकडे पसरते, आणि या घेतलेल्या संपत्तीमुळे या तरुण संशोधकाचे अपहरण होतं !

 

दिग्दर्शक:

क्रीझटॉफ झानुसी- दिग्दर्शक, निर्माता, पटकथा लेखक. जगप्रसिद्ध चित्रपटांचे लेखक: ‘क्रिस्टल स्ट्रक्चर’ (1968), ‘इल्युमिनेशन’ (1973), ‘कॉन्स्टन्स’ (1980), ‘द इयर ऑफ द क्वायट सन’ (1984), ‘एनीव्हेअर, इफ यू आर’ (1988) , ‘क्वाल’ (1996), ‘पर्सोना नॉन ग्राटा’ (2004), ‘Rewizyta’ (2009), फॉरेन बॉडी(2014); अनेक आंतरराष्ट्रीय महोत्सवांमध्ये पुरस्कृत, समावेश. कान्स, व्हेनिस, लोकार्नो, मॉस्को, शिकागो, मॉन्ट्रियल, बर्लिन, टोकियो येथे. क्रीझटॉफ झानुसी हे नाटकांचे दिग्दर्शन देखील करतात तसेच त्यांनी अनेक पुस्तके लिहिली आहेत.

Continue Reading