Connect with us

गोवा खबर

नवे आयटी उद्योग राज्यासाठी वरदान : खंवटे 

Published

on

Spread the love
  • नवी दिल्लीत घेतली केंद्रीय मंत्र्यांची सदीच्छा भेट
गोवा खबर : गोव्याचे पर्यटन आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री रोहन खंवटे यांनी नुकतीच नवी दिल्लीत केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी कुमार वैष्णव यांची भेट घेतली. उभयतांमध्ये गोव्याच्या माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील विकासाबाबत चर्चा झाली. खंवटे यांनी केंद्रीय मंत्री वैष्णव यांना राज्य सरकारने हाती घेतलेल्या आयटी प्रकल्पांची माहिती दिली. नवीन उपक्रमांद्वारे आयटी क्षेत्राला चालना देण्याबाबतच्या सरकारच्या उपाययोजनांची देखील कल्पना खंवटे यांनी त्यांना करून दिली.
केंद्रीय मंत्री वैष्णव आणि खंवटे यांनी राज्याच्या आयटी क्षेत्रातील रोजगार आणि गुंतवणुकीच्या संधींबाबतही सविस्तर चर्चा केली. नवीन आयटी उद्योग राज्यासाठी वरदान ठरणार असून राज्याच्या आयटी क्षेत्राला त्यामुळे एक नवी गती मिळेल असे खंवटे यांनी वैष्णव यांना सांगितले. त्याव्दारे तरुणांसाठीही नव्या संधी निर्माण होतील आणि राज्याच्या अर्थव्यवस्थेलाही चालना मिळेल, असे त्यांनी बैठकीत सांगितले.
दोन्ही मंत्र्यांनी माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील विविध योजना आणि प्रकल्पांवर सखोल व दीर्घ चर्चा केली. केंद्रीय मंत्र्यांनी चालू प्रकल्पांचा आढावा घेतला. केंद्रीय मंत्र्यानी हॅशटेग वर्केशनगोवा या राज्य सरकारच्या संकल्पनेची माहिती करून घेतली. हा उपक्रम प्रायोगिक तत्त्वावर गोव्यातील 3 समुद्रकिनाऱ्यांवर राबविण्यात आला आहे.
केंद्रीय मंत्र्यांसोबत झालेल्या भेटीनंतर गोव्याचे पर्यटन आणि आयटी मंत्री खंवटे यांनी प्रसिद्धीस पाठविलेल्या एका निवेदनात, गोवा हे पसंतीचे आयटी केंद्र बनवण्यासाठी आयटी आणि संबंधित उद्योगांमध्ये गुंतवणूक वाढवण्याच्या आमच्या उपक्रमांना केंद्रीय मंत्र्यांनी सतत समर्थन दिल्याचे म्हटले आहे. त्यांच्या पाठिंब्याने आगामी काळात राज्य सरकार गोव्याच्या ग्रामीण भागातील कनेक्टिव्हिटी समस्या सुधारण्यासाठी प्रयत्नशील असेल अशी ग्वाहीही खंवटे यांनी दिली आहे.

Continue Reading