स्पर्धेत खेळणार मनीष पै काकोडे आणि रणजी खेळाडू वेदांत नाईक
गोवा खबर : पणजी जिमखाना मेंबर्स लीगच्या दुसऱ्या आवृत्तीची लिलाव प्रक्रिया शनिवारी १९ नोव्हेंबर २०२२ , रोजी पूर्ण झाली असून त्यात सहा संघ (बाले टायगर्स , डेम्पो चॅलेंजर्स, मानस मॅव्हरिक्स, प्रेस्कॉन पँथर्स, प्रायॉरिटी टायटन्स आणि आरसी गोवा) गोव्यातील १४८ क्रिकेटपटुंना आपल्या संघात घेण्यासाठी भिडले.
ही टी-२० क्रिकेट स्पर्धा जानेवारी २०२३च्या पहिल्या आठवड्यात सुरू होणार आहे तसेच स्पर्धेच्या विजेत्यांना २ लाखाचा आणि उपविजेत्या १ लाखाचा नगद इनाम पण आहे. तर कार्यक्रमात प्रक्रियेचे नियम स्पष्ट करून लिलावकर्ता फ्रान्सिस्को यांनी लिलाव सुरू केला ज्यात
उपस्थित असलेला सहाही संघांचे व्यवसाय कौशल्य तपासण्यात आले.
राज्यातील यू-२५ खेळाडू, १९ वर्षीय मनीष पै काकोडे हा डेम्पो चॅलेंजर्स या संघाच्या बाजूने खेळणार तसेच सध्याचे रणजी खेळाडू वेदांत नाईक हे प्रायॉरिटी टायटन्स ह्या संघाला खेळणार. लिलाव प्रक्रियेदरम्यात मुख्तार काद्री याला ८५ लाख गुणांची सर्वोच्च बोली लावून डेम्पो चॅलेंजर्स यांनी निवडला, हर्षद गडेकर (६४ लाख ) हा दुसरा उच्च बोली लावलेला खेळाडू आणि तो यावर्षी प्रायॉरिटी टायटन्स यांचा बाजूने खेळणार, तर तिसरी उच्च बोली प्रेस्कॉन पँथर्सद्वारे बुद्धदेव मंगलदास याला होती जी ५५ लाख गुणांची होती. तसेच बाले टायगर्ससाठी कपिल आंगले, तन्मय खोडकर ( मानस मॅव्हरिक्स), श्रीनिवास डेम्पो (डेम्पो चॅलेंजर्स), विनय केडिया प्रेस्कॉन पँथर्स, राजेश देसाई (आरसी गोवा), आणि परिंद नचीनोलकर ( प्रायॉरिटी
टायटन्स ) या सहाही संघांच्या मालिकांच्या हस्ते टीम जर्सीचे अनावरण करण्यात आले. अनावरण वेळी जिमखाना अध्यक्ष मनोज काकुलो आणि सचिव राजेश खऊटे पण उपस्थित होते.
तर ह्या संधर्भात बोलताना पणजी जिमखाना अध्यक्ष मनोज काकुलो म्हणाले की “ जिमखानाने गोव्यात यशस्वी पणे टी -२० लीग तयार केली आहे . सहा संघांनी त्याचे संघ एकत्र ठेवल्याने लिलाव उत्साही होता. तसेच जानेवारी २०२३ मध्ये सुरू होणाऱ्या लीग चा टप्पा आता तयार झाला आहे आणि पणजीमधील प्रतिष्ठित पणजी जिमखाना मैदानावर क्रिकेट मैदानावर क्रिकेट चाहत्यांना आणि समर्थकांना एकत्र येण्यासाठी हा एकत्र येण्यास हे एक निमंत्रण आहे असे पणजी जिमखाना सचिव खऊटे यांनी जोडले.