Connect with us

गोवा खबर

बायचुंग भुतिया, श्री.नीलेश काब्रल यांच्या उपस्थितीत एचसीसीबीने गोव्यात साजरा केला रौप्यमहोत्सव

Published

on

Spread the love

गोवा खबर:पर्यावरण व हवामान बदल, कायदा व न्यायपालिका, विधिमंडळ व्‍यवहार मंत्री नीलेश काब्रल  यांच्या उपस्थितीत एचसीसीबीने पणजीमध्ये आपला रौप्यमहोत्सव साजरा केला.समारंभाला उपस्थित इतर मान्यवरांमध्ये गोवा राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष महेश के. पाटील आणि गोवा राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या सदस्य सचिव डॉ. शमिला मोंटेरियो यांचा समावेश होता.एचसीसीबीच्या वतीने मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) ज्युआम पाबलो यांनी समारंभाचे यजमानपद भूषवले.

 श्री. नीलेश काब्रल यांनी एचसीसीबीचे स्थिरता उपक्रम ‘अॅक्‍ट ऑफ सर्क्‍युलारिटी’ आणि ‘रिव्‍हर्स लॉजिस्टिक्‍स’ या गोव्‍यामध्‍ये लवकरच सादर करण्‍यात येणाऱ्या संकल्‍पनांचे अधिकृतरित्या उद्घाटन  केले. या उपक्रमाचे कौतुक करत माननीय मंत्री म्‍हणाले, “फक्त पुनर्वापर करता येण्याजोग्या सामग्रीचे संकलनच नव्हे तर त्यांच्या उत्पादनांच्या निर्मितीसाठी त्याचा पुन्हा वापर करण्याच्या पुढाकारासाठी एचसीसीबीच्या प्रयत्नांची मी प्रशंसा करतो. हे इतर उद्योग आणि संस्थांसाठी पर्यावरणीय फूटप्रिंट सुधारण्यासाठी अशाच अपारंपरिक मार्गांचा शोध घेण्यासाठी एक आदर्श स्‍थापित करेल.’’या समारंभात भारतीय फूटबॉल संघाचे माजी कर्णधार बायचुंग भुतिया विशेष आतिथी म्हणून उपस्थित होते.

त्यांनी एचसीसीबीचे विकास तत्त्व – “जिज्ञासू, सशक्त, सर्वसमावेशकता व चपळता” यावर विचारशील सत्र घेतले आणि या गुणांनी त्‍यांना त्‍यांच्‍या कारकिर्दीत यशस्वी होण्यास कशी मदत केली याबाबत सांगितले. आपल्या स्वत:च्या फूटबॉल कारकिर्दीतील उदाहरणे त्यांनी दिली तसेच एचसीसीबीचा २५ वर्षांचा प्रवासही सर्वांपुढे मांडला.