Connect with us

गोवा खबर

आयर्नमॅन ७०.३ मध्ये सहभागी होणार उत्तर गोवा जिल्हाधिकारी मामू हागे

Published

on

Spread the love

 

त्यांनी आपल्या विभागासाठी योस्कासोबत एक विशेष तंदुरुस्ती कार्यक्रम सुरू केला आहे.

गोवा खबर : उत्तर गोवा जिल्हाधिकारी आणि जिल्हा दंडाधिकारी मामू हागे (३४) या १३ नोव्हेंबर रोजी पणजी येथे होणार्‍या आगामी आयर्नमॅन ७०.३ गोवा कार्यक्रमात भाग घेणाऱ्या पहिल्या महिला आयएएस अधिकाऱ्यांपैकी एक असतील.

अरुणाचल प्रदेशच्या मामू एक चांगल्या जलतरणपटू आहेत. त्या आयएएस अधिकाऱ्यांचा समावेश असलेल्या तीन व्यक्तींच्या रिले संघाचा भाग असणार आहेत. हा संघ स्पर्धेत ११३ किमीची (१.९ किमी पोहणे + ९० किमी सायकलिंग + २१ किमी धावणे) शर्यत करेल.

शनिवारी शहरात जारी केलेल्या एका प्रसिद्धी पत्रकात, मामू म्हणाल्या की,  “मला नवीन गोष्टी करायला आवडतात. ज्या क्षणी योस्का टीम आयर्नमॅन ७०.३ गोवा सोबत माझ्या दारात आली, मी ठरविले की मला हे करायचेच आहे.  योस्का टीम गेल्या काही आठवड्यांपासून मला माझ्या प्रशिक्षणात मदत करत आहे.  आयर्नमॅनमध्ये सहभागी होण्यास मी उत्सुक आहे. मी शर्यत वेळेत पूर्ण करेन अशी आशा आहे.”

तयारीबद्दल मामू यांनी सांगितले की,  “प्रामाणिकपणे सांगायचे तर शर्यतीच्या दिवसाआधी फारसा वेळ शिल्लक नाही, पण मला वाटते की ते फक्त एक निमित्त आहे. माझ्या सहभागाने नागरी सेवांमधील अधिकाधिक महिलांना फिटनेस घेण्यास प्रेरणा मिळाली तर मला खरोखर आनंद होईल.”

 

पंतप्रधान मोदींच्या “फिट इंडिया” मोहिमेवर ठाम विश्‍वास ठेवणारे, मामू यांना वाटते की आयर्नमॅन ट्रायथलॉन आणि फिट इंडिया मूव्हमेंट पूरक आहेत. त्या गोवासियांना तंदुरुस्त जीवन जगण्यास मदत करतील. त्या म्हणाल्या, “आयर्नमॅन ही एक जागतिक स्पर्धा आहे आणि गोवा नेहमीच खेळाशी संबंधित आहे. मग तो एफसी गोवा असो किंवा फिफा १७ वर्षांखालील महिला विश्वचषक असो. फिट इंडिया चळवळीचा हेतू निरोगी जीवन जगण्यासाठी लहान सवयी निर्माण करणे हा आहे.  आयर्नमॅन त्या संकल्पनेला मूर्त रूप देते. ते सर्व वयोगटातील आणि लिंगांच्या लोकांना चळवळीचा भाग बनण्याची संधी देते.”

विशेष म्हणजे, मामू यांनी योस्कासोबत त्यांच्या स्वतःच्या विभागासाठी तंदुरुस्ती प्रोग्राम सुरू केला आहे. “योस्का या आधीच पोलिस आणि अग्निशमन विभागासाठी तंदुरुस्ती प्रोग्राम करत आहे होते. त्यामुळे माझा विभाग चुकू नये असे मला वाटत होते. जीवनात काम, तंदुरुस्ती आणि विश्रांतीचा समतोल साधल्यास तुम्ही अधिक उत्पादक बनता” असे त्यांनी सांगितले.