गोवा खबर:मिरामार येथील 1.57 लाखांच्या चोरी प्रकरणी पणजी पोलिसांनी गोव्यासह कर्नाटक, आंध्रप्रदेश आणि ओडिशा राज्यात मिळून 48 हुन अधिक चोरीचे गुन्हे दाखल असलेल्या ओडिशा येथील संतोष कुमार या अट्टल गुन्हेगाराच्या मुसक्या आवळण्यात यश मिळवले आहे.
संशयिताने मिरामार येथे सुमारे 1.57 लाखाची चोरी केली होती. या तपासात तो पणजी पोलिसांच्या हाती लागला असून गुन्हेगारावर तब्बल 48 चोरीच्या गुन्ह्यांची नोंद आहे.यातील 15 ओडिशा मधील,29 आंध्रप्रदेश मधील तर 4 कर्नाटक मधील गुन्हे समाविष्ट आहेत.