Connect with us

गोवा खबर

“अमृत महोत्सव – लास्टिंग लेगसीज” मध्ये झळकले आपचे कॅप्टन व्हेन्झी व्हिएगस, भारताचे पहिले मास्टर मरिनर आमदार 

Published

on

Spread the love
गोवा खबर:भारतीय मेरीटाईम युनिव्हर्सिटीव्दारे प्रकाशित केलेल्या “अमृत महोत्सव – लास्टिंग लेगसीज” नावाच्या कॉफी टेबल बुकमध्ये देशातील पहिले मास्टर मरिनर आमदार म्हणून आम आदमी पार्टीचे कॅप्टन व्हेंझी व्हिएगस यांना नावाजण्यात आले आहे. 
व्हिएगस यांनी 2011 मध्ये युनायटेड किंगडममधील साउथ शिल्ड्समधील साउथ टायनेसाइड कॉलेजमधून नॉटिकल सायन्समध्ये डिप्लोमा मिळवला होता.
यावर प्रतिक्रिया देताना व्हिएगस म्हणाले, “मला बाणावलीचा प्रतिनिधी म्हणून सेवा करण्याची संधी दिल्याबद्दल बाणावलीच्या लोकांचे मी धन्यवाद करतो. त्यांच्यामुळे आज इतिहासात नवा अध्याय लिहिला जात आहे.” सागरी भारताच्या गौरवशाली परंपरांची नोंद करण्यासाठी विशेषतः हे कॉफी टेबल बुक प्रसिध्द करण्यात आले आहे.