गोवा खबर: मोग संडे हा कार्यक्रम प्रत्येक रविवारी, पिळर्णातील म्युझिअम ऑफ गोवा ह्या संग्रहालयात आयोजित केला जातो, तर गेल्या रविवारी ह्या कार्यक्रमासाठी संरक्षक अॅलेक्स कार्पेन्टर यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. ‘उष्णकटिबंधीय वन संरक्षण आणि शाश्वतता’ हा त्यांच्या व्याख्यानाचा विषय होता.
जंगली क्षेत्र साफ करून काजू बागायत वाढवण्याच्या प्रयत्नामुळे या उन्हाळ्यात गोव्याच्या मध्यवर्ती भागात आग लागली असेल असे संरक्षक अॅलेक्स कार्पेन्टर यांचे मानने आहे.अॅलेक्स कार्पेंटर हे ट्री ट्राईब या संवर्धन एनजीओचे सह-संस्थापक आणि व्यवस्थापिका संचालक आहेत त्यासोबत तेच ट्राइब वाइल्डलाइफ रेस्क्यूचे संस्थापक देखील आहेत.

त्यांनी आपल्या व्याख्यानात गोव्यातील मध्य जंगली भागात लागलेल्या आगीवर भर दिली. या आगींमध्ये एक प्राथमिक योगदान म्हणजे काजू लागवड वाढवण्यासाठी जंगलाच्या भागांना आग लावण्याची प्रथा आहे असे ही त्यांनी सांगितले.
वन भागात, लोकं काजू पिकवण्यासाठी जंगले साफ करत आहेत, या भागात जाण्यासाठी, लागवडीसाठी काजू बियांची पोती घेऊन चार किलोमीटरची आव्हानात्मक पदयात्रा करावी लागते. शेवटी, जंगलाच्या रक्षणाची जबाबदारी स्थानिक ग्रामस्थांवर येते.

गोव्यातील जंगले उष्णकटिबंधीय आहेत आणि जंगलात आग लागण्याचे घातक परिणाम होतात, गोव्यातील माती आणि जंगलातील आग यांच्या मध्ये छत्तीसचा आंकडा आहे, करण गोव्यात उष्णतेचा प्रहार कमी आहे आणि आपली जंगले आणि माती त्यासामोरे जाण्यास उत्कांत झाले नाहीत, ज्यामुळे मातीला आणखी हानी होते. तर अशी परिस्थिती आली की जमिनीची सुपीकता, जंगलातील मजल्याची कार्ये आणि प्रक्रिया, सामग्रीचे विघटन करण्याची क्षमता आणि मातीचे संवर्धन यामध्ये महत्त्वपूर्ण समस्या निर्माण होतात.

राज्य सरकारच्या अहवालानुसार, या उन्हाळ्यात जंगलात लागलेल्या आगीमुळे तीन वन्यजीव अभयारण्यांसह सुमारे ४.१८ चौरस किलोमीटर वनक्षेत्र भस्मसात झाले आहे.
मानवी हस्तक्षेपामुळे जंगलाचे इतके नुकसान झाले आहे की एकटा निसर्ग स्वतःहून ते वाचवू शकत नाही, असे मत एका ब्रिटिश प्रवासाचे होते. आपण आपली जंगले पुनर्संचयित केली पाहिजेत. जगभरातील लोकांना वर्तमानात निसर्ग संवर्धनाचे महत्व पटत आहे, मानव जातीने जंगलाला इतके नुकसान केले आहे की ते नैसर्गिकरित्या स्वतःला बरे करू शकत नाही. जर आम्ही आत्ताच कृती केली नाही तर आमच्याकडे जमीन उरणार नाही, आपण इतर कशावरही अवलंबून असतो, तसेच जगण्यासाठी आवश्यक आहे.
तसेच गोव्याने वाघाचे अस्थिव स्वीकारले पाहिजे ते आपण नाकारता काम नये असे ही त्यांनी जोडले. आपल्याला झाडांवर दिसणारे लता हे अधोगतीचे लक्षण आहे. ही झाड कोसळण्या अगोदरची संथ गती आहे” असे कार्पेंटर यांनी सांगितले.