गोवा खबर : पर्यावरण मंत्री विश्वजित राणे यांनी पर्यावरणाच्या दृष्टीने एक ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. मांडवी आणि जुवारी या प्रमुख नद्यांच्या काठावरील सुमारे ६.७२ कोटी चौरस मीटर जमीन आता ‘इको सेन्सिटिव्ह’ झोन म्हणून संरक्षित केली जाणार आहे.
हरितपट्टा संरक्षण: या भागातील नैसर्गिक आच्छादन आणि खाजण जमिनींचे संरक्षण करण्यासाठी वन विभागाने टीसीपी (TCP) खात्याला पत्र पाठवले आहे.
बांधकामावर बंदी: पोंबुर्फा आणि मांद्रे येथील सुमारे ३० लाख चौ.मी. जमीन ‘नो डेव्हलपमेंट झोन’ मध्ये समाविष्ट करण्याची शिफारस करण्यात आली आहे. या निर्णयावर हरकती नोंदवण्यासाठी ३० दिवसांचा अवधी देण्यात आला आहे.