गोवा खबर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मन की बात’ कार्यक्रमात गौरव केलेल्या समाजसेवक बाळकृष्ण अय्या यांचा भाजपच्या वतीने विशेष सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमाला भाजप प्रदेशाध्यक्ष दामू नाईक, सरचिटणीस सर्वानंद भगत, मंत्री डॉ. रमेश तवडकर तसेच पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
बाळकृष्ण अय्या यांनी समाजासाठी केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मन की बात’मध्ये घेतली होती. त्यांच्या निस्वार्थ सेवाभावी कार्याचे कौतुक करत भाजप नेत्यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या.
यावेळी उपस्थितांनी बाळकृष्ण अय्या यांचे समाजाप्रती असलेले समर्पण हे सर्वांसाठी प्रेरणादायी असल्याचे सांगितले. तसेच ‘मन की बात’सारख्या राष्ट्रीय व्यासपीठावर गोव्यातील समाजसेवेची दखल घेतली जाणे ही राज्यासाठी अभिमानाची बाब असल्याचे मत व्यक्त करण्यात आले.
बाळकृष्ण अय्या यांच्या कार्यामुळे समाजात सकारात्मक बदल घडत असून, त्यांच्या सेवाभावातून अनेकांना प्रेरणा मिळत असल्याचे यावेळी नमूद करण्यात आले.